12 January 2025 3:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल Home Loan Prepayment | गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडताय, प्री-पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या पेनल्टी चार्जेस किती भरावे लागतील SBI Bank Scheme | SBI बँकेच्या नव्या योजनेचा फायदा घ्या; केवळ 80 रुपयांच्या गुंतवणुकीतून बनाल लाखांचे मालक
x

Business Idea | महिला आणि तरुण सुद्धा घरातून सुरु करू शकतात 'हा' डिमांडिंग व्यवसाय, महिना लाखोत कमाई होईल

Business Idea

Business Idea | जर तुम्हाला तुमच्या नोकरीसोबत काही काम करायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला एक चांगली बिझनेस आयडिया देत आहोत. अगदी कमी गुंतवणुकीत तुम्ही घरबसल्या हा व्यवसाय सुरू करू शकता. त्यात चांगले पैसे मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.

हा व्यवसाय अगदी घरातून सुद्धा सुरु करता येईल

विश्वास ठेवा, कमी खर्चात हे अधिक फायदेशीर असलेला हा उद्योग आहे. अगदी घरातून सुद्धा सुरु करता येईल हा डिमांडिंग बिझनेस. हा व्यवसाय टी-शर्ट छपाईचा व्यवसाय आहे. तसेही टेक्नॉलॉजी आणि फॅशनच्या जमान्यात प्रत्येकाला टी-शर्ट घालायचे असतात. बाजारात त्यांची विक्रीही मोठ्या प्रमाणात दिसून येते. तसेच आजकाल टी-शर्ट छापण्याची मागणी झपाट्याने वाढली आहे.

दर महिन्याला भरपूर कमाई

मुंबई सेंट्रलमध्ये राहणारा प्रशांत हा टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय करतो. ज्यामुळे त्यांची दर महिन्याला भरपूर कमाई होते. अँबो टी-शर्ट असे त्यांच्या व्यवसायाचे नाव आहे. याबाबत बोलताना प्रशांत म्हणाला की, तो घरूनच हा व्यवसाय करतो. नोकरी करता असताना स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असल्याने टी-शर्टवर छापलेले डिझाईन आणि कोट्स विकण्याची कल्पना त्याला सुचली.

ऑल सिझन ट्रेंडिंग व्यवसाय

हा ऑल सिझन ट्रेंडिंग व्यवसाय आहे. लोकांना त्यांचे छापील टी-शर्ट खूप आवडतात, यामागे एक कारण आहे. तुम्ही टी-शर्टवर मराठी सहित विविध भाषेत लिहिलेली कविता, उद्गार, नावे छापून विकू शकता. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे ते छपाई करतात.

अत्यंत कमी गुंतवणूक आणि अवघ्या दहा सेकंदात टी-शर्टवर डिझाइन सह प्रिंट होईल

हा व्यवसाय चालवण्यासाठी त्यांनी एकच प्रिंटिंग मशीन ठेवली आहे. हीट कॉम्प्रेसर असे या मशिनचे नाव असून ते प्रशांत ने 60 हजारात विकत घेतले होते. या मशिनमुळे अवघ्या १० सेकंदात टी-शर्टवर डिझाइन छापले जाते. तामिळनाडूतून स्वस्त दरात कापड आणून त्यावर ट्रेंडिंग डिझाईन छापून बाजारात टी-शर्ट पुरवतो, असे प्रशांत ने सांगितले. एक टी-शर्ट 499 रुपयांपर्यंत विकला जातो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Business Idea Sunday T-Shirt Printing 12 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Business Idea(86)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x