12 January 2025 4:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल Home Loan Prepayment | गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडताय, प्री-पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या पेनल्टी चार्जेस किती भरावे लागतील
x

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन कंपनीने इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनीतील त्यांची ३ टक्के हिस्सेदारी २८०० कोटी रुपयांना विकली आहे. व्होडाफोन कंपनीने इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनीतील ३ टक्के हिस्सेदारी म्हणजे एकूण ७.९२ कोटी शेअर्स विकले आहेत. त्यातून व्होडाफोन कंपनीला मिळालेले ८९० कोटी रुपये कर्जदारांची थकबाकी फेडण्यासाठी करणार आहे.

व्होडाफोन कंपनीने काय म्हटले

व्होडाफोन ग्रुपने गेल्या वर्षी म्हणजे 5 डिसेंबर 2024 रोजी इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा केली होती. व्होडाफोन कंपनीने इंडस लिमिटेड कंपनीमधील उर्वरित 7.92 कोटी शेअर्सची गुंतवणूक यशस्वीरित्या पूर्ण केली आहे, जे इंडस लिमिटेड कंपनीच्या उर्वरित भागभांडवलाच्या 3.0 टक्के आहे.

व्होडाफोन ग्रुपच्या पूर्ण मालकीच्या उपकंपन्या ओमेगा टेलिकॉम होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड आणि उषा मार्टिन टेलिमॅटिक्स लिमिटेड यांच्या माध्यमातून कंपनीचा तीन टक्के हिस्सा होता. उर्वरित रक्कम व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीमधील १.७ अब्ज इक्विटी शेअर्स शेअर्सच्या प्रिफरेंशियल अलॉटमेंट (कॅपिटल ऍप्रिसिएशन) द्वारे खरेदी करण्यासाठी वापरण्यात आली आहे.

त्यामुळे व्होडाफोन ग्रुपचा व्होडाफोन आयडिया कंपनीमधील हिस्सा २२.५६ टक्क्यांवरून २४.३९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. व्होडाफोन ग्रुपकडून मिळालेल्या या भांडवलातून मिळालेल्या रकमेचा वापर व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने इंडस कंपनीला थकित सेवा करार भरण्यासाठी केला आहे.

सेंट्रम ब्रोकिंग फर्मने शेअरबाबत काय म्हटले

व्होडाफोन आयडिया कंपनीचे मार्केट कॅप सध्या ५४,०१७.३६ कोटी रुपये होते. सेंट्रम ब्रोकिंग फर्मने डिसेंबर तिमाहीत व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीला ७,१२९ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. दुसऱ्या तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीचा तोटा ७,२७५ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 5 टक्क्यांनी वाढून 11,206 कोटी रुपये होण्याचा अंदाज बोरकरेजने व्यक्त केला आहे. अलीकडेच सिटी ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरवर १३ रुपयांचे टार्गेट प्राइस निश्चित केली होती, तसेच शेअरवर ‘BUY’ रेटिंग सह ‘हाय रिस्क’ रिमार्क कायम ठेवला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price Saturday 11 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(147)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x