13 January 2025 2:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Penny Stocks | 82 पैशाच्या पेनी शेअरने होतेय मल्टिबॅगर कमाई, यापूर्वी दिला 720% परतावा, डिटेल्स नोट करा - Penny Stocks 2025 IPO GMP | पैसे तयार ठेवा, 4 नवीन IPO लाँच होत आहेत, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड जाणून घ्या - IPO Watch IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ICICI डायरेक्ट ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि मजबूत अमेरिकी डॉलर, तसेच आगामी केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी एफआयआय’कडून होणारी विक्री यामुळे भारतीय शेअर बाजारातील घसरण थांबताना दिसत नाही. सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये जवळपास ८०० अंकांची घसरण झाली आहे. तर एनएसई निफ्टी देखील २२५ अंकांनी घसरला आहे. दरम्यान, सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरबाबत अरिहंत कॅपिटल मार्केट्स ब्रोकरेज फर्मने महत्वाचे संकेत दिले आहेत.

सुझलॉन एनर्जी शेअरची सध्याची स्थिती

सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 0.88 टक्क्यांनी वाढून 56.06 रुपयांवर पोहोचला होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 86.04 रुपये होता, तर सुझलॉन एनर्जी शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 35.50 रुपये होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 76,106 कोटी रुपये आहे.

अरिहंत कॅपिटल मार्केट्स ब्रोकरेज फर्म – तज्ज्ञांचा सल्ला

अरिहंत कॅपिटल मार्केट्स ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट विश्लेषक मिलिन वासुदेव म्हणाले की, ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरच्या दैनंदिन चार्टवर ‘लोअर-लो’ तयार होत आहेत, जे सुझलॉन एनर्जी स्टॉकबाबत नकारात्मक संकेत देत आहे. शिवाय सुझलॉन एनर्जी शेअरच्या किंमती 200-दिवसांच्या SMA (60.62 रुपये) च्या खाली ट्रेड करत आहेत. तसेच RSI सारख्या मोमेंटम इंडिकेटरमध्येही नकारात्मक संकेत दिसत आहेत असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

सध्या सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर बेंचमार्क निर्देशांकांपेक्षा कमी कामगिरी करत आहे. पुढे मिलिन वासुदेव म्हणाले की, ‘सुझलॉन शेअर टेक्निकल चार्टसंबंधित सर्व पॅरामीटरचा विचार केल्यास सुझलॉन एनर्जी शेअरमधील घसरणीचा वेग कायम राहण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत सुझलॉन एनर्जी शेअर 45 ते 40 रुपयांपर्यंत घसरून शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी 60 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा आणि 59 रुपयांच्या पातळीवर सुझलॉन शेअर ‘SELL’ करावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price Monday 13 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(291)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x