14 January 2025 3:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: JIOFIN

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपच्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरमध्ये सलग चौथ्या दिवशी घसरण झाल्याचं दिसून आलं होतं. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअर 5.24 टक्क्यांनी घसरून 265.85 रुपयांवर पोहोचला होता.

शेअरची 11 महिन्यांतील नीचांकी पातळी

सोमवारी दिवसभरात जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअरने 265.05 रुपयांची नीचांकी पातळी गाठली होती. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअरची ही पातळी ११ महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. 13 फेब्रुवारी 2024 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअर 270 रुपयांच्या खाली ट्रेड करत होता.

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअरचा मूव्हिंग एव्हरेज

सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअरने 265.05 रुपयांची पातळी गाठली होती. सोमवारी कंपनीच्या एकूण १.५९ कोटी शेअर्सचे ट्रेड पार पडले होते. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअर गेल्या 4 दिवसांपासून 11.29 टक्क्यांनी घसरला आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअर 5-दिवस, 20-दिवस, 50-दिवस, 100-दिवस आणि 200-दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजच्या खाली ट्रेड करत आहेत.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर टार्गेट प्राईस

ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञ महत्वाचा सल्ला देताना म्हणाले की, ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअर टेक्निकल चार्टवर कमकुवत दिसत आहे. तसेच जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअर्स गुंतवणूकदारांनी शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक केली असेल तर त्यांनी या शेअरमधून बाहेर पडावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच लॉन्ग टर्म गुंतवणूक करणाऱ्यांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये गुंतवणूक करावी असा सल्ला देखील देण्यात आला आहे.

तर पुलबॅक रॅली पाहायला मिळू शकते

स्टॉक मार्केट विश्लेषक पुढे म्हणाले की , ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअर सातत्याने शॉर्ट टर्म मूव्हिंग एव्हरेजच्या खाली ट्रेड करतोय. जर जिओ फायनान्शियल शेअरचा २७० रुपयांचा सपोर्ट तुटला तर घसरण सुरूच राहू शकते. मात्र जिओ फायनान्शिअल शेअरने २७० रुपयांची पातळी कायम ठेवल्यास पुलबॅक रॅली पाहायला मिळू शकते. त्यामुळे लॉन्ग टर्म गुंतवणूक करणाऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Finance Share Price Monday 13 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(56)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x