15 January 2025 5:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल
x

NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN

NTPC Green Share Price

NTPC Green Share Price | पीएसयू एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा आयपीओ प्रचंड चर्चेत आला होता. एनटीपीसी ग्रीन एनर्जी आयपीओ शेअरने शेअर बाजारात सूचिबद्ध होण्याच्या दिवशीच मजबूत परतावा दिला होता. मात्र, एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर जवळपास ४० टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर १०० रुपयांच्या खाली घासणार

मंगळवारी एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी शेअरमध्ये मजबूत तेजी दिसून आली होती. आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर 10 टक्क्यांच्या वाढीसह 120.98 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. एक दिवस आधी म्हणजे सोमवारी एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये मोठी घसरण होऊन तो 52 आठवड्यांची नीचांकी पातळी म्हणजे 109.41 रुपयांपर्यंत घसरला होता. ही नीचांकी पातळी आयपीओ इश्यू किमतीच्या जवळपास होती. गेल्या १ महिन्यात या शेअरमध्ये 14.94 टक्क्यांची घसरण झाली आहे. मात्र, आता एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर १०० रुपयांच्या खाली घसरेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

एनटीपीसी ग्रीन शेअरसाठी ‘SELL’ रेटिंग

एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरबाबत अँबिट ब्रोकिंग फर्मने नकारात्मक संकेत दिले आहेत. अँबिट ब्रोकिंग फर्मने एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी शेअरसाठी ७० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. अँबिट ब्रोकिंग फर्मने एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअरसाठी ‘SELL’ रेटिंग जाहीर केली आहे. म्हणजे शेअर सध्याच्या पातळीपेक्षा ४० टक्क्यांनी घसरू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जीकडून अपडेट

एनटीपीसी अपडेट देताना म्हटले आहे की, ‘एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीची उपकंपनी एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीने दोन वेगवेगळ्या सौर प्रकल्पांमधून ११० मेगावॅट विजेचा कमर्शिअल पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे एनटीपीसी ग्रुपची एकूण स्थापित आणि कमर्शिअल क्षमता आता ७६,७०८.१८ मेगावॅट पर्यंत पोहोचली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Green Share Price Wednesday 15 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#NTPC Green Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x