16 January 2025 1:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल

Personal Loan

Personal Loan | व्यक्तीचे जीवन हे स्थिर नसते. जीवनात काही चांगले दिवस असतात तर काही वाईट. प्रत्येक संकटातून व्यक्तीला वर येऊन नियतीशी दोन हात करावेच लागतात. त्याचबरोबर इतर सर्व गोष्टींचे सोंग करता येऊ शकते परंतु पैशांचे सोंग कधीही करता येत नाही. एखादी अडीअडचण आलीच तर व्यक्ती नातेवाईकांकडून किंवा मित्र-मैत्रिणींकडून उसने पैसे घेण्याचा विचार करतो. तर, इतर ठिकाणी पैशांची सोय झाली नाही तर थेट वैयक्तिक कर्ज घेण्याकरिता बँकेकडे धाव घेतो.

व्यक्तीला वैयक्तिक कर्ज अगदी चटकन मिळते. परंतु, बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्याआधी तुम्हाला वैयक्तिक कर्जाशी निगडित काही गोष्टींची माहिती असायला हवी. तुम्ही बँकांच्या अटी आणि नियम पाळले नाही तर मात्र तुम्ही अडचणीत सापडू शकता. आज आम्ही तुम्हाला वैयक्तिक कर्जाविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत. पटापट माहिती जाणून घ्या.

वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय :

आज आम्ही तुम्हाला वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुमचा पगार किती रुपयांपर्यंत असणे गरजेचे आहे हे सांगणार आहोत. तुम्हाला वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर सर्वप्रथम बँक तुमचा पगार तपासते. तुमच्या विशिष्ट दर्जाच्या पगारावरच बँक तुम्हाला वैयक्तिक कर्ज देण्याचा विचार करते. त्यामुळे, तुम्ही देखील वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर, तुमचा पगार 15 ते 25 हजार या आकड्या दरम्यान असणे गरजेचे आहे. तुमच्या पगाराच्या आधारावर तुम्हाला किती रक्कम वैयक्तिक कर्जत स्वरूपात द्यायची ही बाब बँक निश्चित करते.

वैयक्तिक कर्ज फेडण्याचा कालावधी किती असतो जाणून घ्या :

बहुतांश व्यक्तींना वैयक्तिक कर्ज घेतल्यानंतर किती कालावधीपर्यंत फेडायचे हे ठाऊकच नसते. तसं पाहायला गेलं तर, आपण वेगवेगळ्या प्रकारचे वैयक्तिक कर्ज घेतो. ज्यामध्ये लग्नकार्य, घराची डागडुजी, किंवा नूतनीकरण त्याचबरोबर आर्थिक गरजा, आपत्कालीन परिस्थिती या सर्व गोष्टी वैयक्तिक कर्जअंतर्गत येतात. घेतलेले कर्ज फेडण्यासाठी बहुतांश बँका 12 ते 60 महिन्यांचा कालावधी कर्ज फेडण्यासाठी देतात.

कुठली कागदपत्रे आहेत महत्त्वाची :

वैयक्तिक कर्ज घेत असाल तर तुम्हाला जास्त कागदपत्रांची पूर्तता करावी लागत नाही. केवळ एखादे ओळखपत्र आणि तुमच्या राहत्या घराचा पत्ता या दोन गोष्टींची ठोस कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतात.

वैयक्तिक कर्जावर तुम्हाला किती टक्क्यांनी व्याजदर मिळते :

वेगवेगळ्या बँका वैयक्तिक कर्जावर वेगवेगळे व्याजदर देतात. तुम्ही एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला 10.45 टक्क्यांपासून ते 24 टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारले जाऊ शकतात. केवळ व्याजदरच नाही तर तुमच्याकडून जीएसटी आणि प्रक्रिया शुल्क देखील घेतले जातात. जे वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे असू शकतात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Personal Loan Wednesday 15 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Personal Loan(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x