15 January 2025 10:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | बुधवार, 15 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केट सलग दुसऱ्या दिवशी तेजीसह बंद झाला. एनएसई निफ्टी 37 अंकांनी वाढून 23,213 वर बंद झाला होता, तर बीएसई सेन्सेक्स 224 अंकांनी वाढून 76,724 वर बंद झाला होता. बुधवारी अनेक कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. या तेजीत विसागर पॉलिटेक्स लिमिटेड या कंपनीचा पेनी स्टॉक देखील फोकसमध्ये आला होता.

येस बँक लिमिटेड कंपनी शेअरची सध्याची स्थिती

बुधवार, 15 जानेवारी 2025 रोजी येस बँक लिमिटेड कंपनी शेअर 0.28 टक्क्यांनी घसरून 17.97 रुपयांवर पोहोचला होता. येस बँक लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 32.85 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 17.06 रुपये होता. येस बँक लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 56,306 कोटी रुपये आहे.

टेक्निकल चार्टवरील येस बँक शेअरबाबत संकेत

तांत्रिकदृष्ट्या, येस बँक शेअर 18.8 रुपये ते 18 रुपयांच्या रेंजमध्ये दिसू शकतो, काही विश्लेषकांनी देताना नजीकच्या काळात येस बँक शेअर २२ रुपयांच्या आसपास पोहोचू शकतो असे संकेत दिले आहेत. सापेक्ष कामगिरीच्या बाबतीत येस बँके शेअरने बँकिंग क्षेत्रापेक्षा २.७२ टक्क्यांनी नकारात्मक परतावा दिला आहे. सततच्या घसरणीनंतर येस बँक शेअर मागील १ महिन्यात जवळपास 15.44 टक्क्यांनी घसरला आहे.

येस बँक शेअर प्राईस दैनंदिन चार्टवर किंचित तेजीचा संकेत देत होता. तसेच शेअरला 18.8 रुपयांवर मजबूत सपोर्ट होता, मात्र आता शेअर 17.97 रुपयांवर पोहोचला आहे. पुढे येस बँक शेअर २०.३ रुपयांच्या तात्कालिक रेझिस्टन्सच्या वर बंद झाल्यास नजीकच्या काळात तो २१.८ रुपयांपर्यंत वाढू शकतो असे संकेत सेबीचे नोंदणीकृत संशोधन विश्लेषक ए. आर. रामचंद्रन यांनी दिले होते.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस रिपोर्ट

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने म्युच्युअल फंडांनी कोणत्या शेअर्सची खरेदी-विक्री केली याबाबत माहिती देणारा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टमध्ये, येस बँकेच्या म्युच्युअल फंड होल्डिंगमध्ये मासिक आधारावर १६६.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता येस बँकेतील म्युच्युअल फंड कंपन्यांचा एकूण हिस्सा आता ४३० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Yes Bank Share Price Wednesday 15 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(210)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x