17 January 2025 1:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: APOLLO Yes Bank Share Price | येस बँकबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, ब्रोकरेज बुलिश - NSE: YESBANK Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: IRB Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY Penny Stocks | 88 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, यापूर्वी दिला 2833% परतावा - Penny Stocks 2025 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाच्या मंजुरीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात 44.44% वाढ, तर बेसिक सॅलरी 26,000 पर्यंत वाढणार
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAPOWER

Tata Power Share Price

Tata Power Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही मुख्य निर्देशांक तेजीसह बंद झाले होते. मागील सलग तीन दिवस शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे. या तेजीचे टॉप ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत देताना टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.

टाटा पॉवर कंपनी शेअरची सध्याची स्थिती

गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी टाटा पॉवर कंपनी शेअर 0.97 टक्क्यांनी वाढून 369 रुपयांवर पोहोचला होता. टाटा पॉवर कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 494.85 रुपये होती, तर टाटा पॉवर कंपनी शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 335.30 रुपये होती. टाटा पॉवर कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,17,860 कोटी रुपये आहे.

टाटा पॉवर कंपनीची योजना

डिसेंबर २०२४ मध्ये टाटा पॉवर कंपनीने भूतानमध्ये ६,९०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने भूतानच्या खोर्लोचू जलविद्युत प्रोजेक्टचे बांधकाम सुरू झाल्याची माहिती स्टॉक एक्सचेंजला फायलिंगमार्फत दिली आहे. तसेच या प्रकल्पाच्या उभारणीसाठी ६,९०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली आहे. पूर्व भूतानमधील हा प्रकल्प सप्टेंबर २०२९ मध्ये कार्यान्वित होईल असा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे.

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग

टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरसाठी टॉप ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने खरेदीची शिफारस केली आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकिंग फर्मने टाटा पॉवर कंपनी स्टॉकसाठी ‘BUY’ रेटिंग सह 509 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. या टार्गेट प्राईस प्रमाणे टाटा पॉवर शेअर गुंतवणूकदारांना सध्याच्या पातळीपेक्षा ४५ टक्क्यांनी अधिक परतावा मिळू शकतो.

टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरने 2.22% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 13.28% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 15.54% घसरला आहे. मागील १ वर्षात शेअरने 4.40% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरने 499.51% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये शेअरने 3,517.65% परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 5.95% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Power Share Price Thursday 16 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(153)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x