19 January 2025 12:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
x

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जारी करण्यात आले आहेत. डिसेंबर तिमाहीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचा नफा २९५ कोटी रुपयांवर पोहोचाल आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने २९४ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. कंपनीचा नफा अल्प प्रमाणात वाढला असला तरी स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत.

डिसेंबर तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न

डिसेंबर तिमाही आकडेवारीनुसार जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या एकूण उत्पन्नात वाढ होऊन ते ४४९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षी याच तिमाहीत ४१४ कोटी रुपयांवर होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीचा एकूण खर्च सुद्धा ९९ कोटी रुपयांवरून वाढून १३१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच कंपनीचा निव्वळ नफ्यात किंचित वाढ होऊन तो १,२९६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत निव्वळ नफा १,२९४ कोटी रुपयांवर होता.

कंपनी शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवारी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर 0.70 टक्क्यांनी वधारून 278.75 रुपयांवर बंद झाला होता. शुक्रवारी दिवसभरात शेअरने 275.70 रुपयांची नीचांकी पातळी गाठली होती. एप्रिल 2024 मध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरने 394.70 रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता. तो जिओ फायनान्शियल शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक होता.

जिओ फायनान्शियल शेअर टार्गेट प्राईस

केआर चोक्सी फिनसर्व्ह बोकरेज फर्मने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. केआर चोक्सी फिनसर्व्ह बोकरेज फर्मने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअरसाठी ‘होल्ड’ रेटिंग सह ३४५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक होणार

जेएम फायनान्शिअलच्या अहवालानुसार, ‘फेब्रुवारी 2025 मध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअर निफ्टी 50 निर्देशांकात प्रवेश करू शकतो. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअरचा निफ्टी ५० मध्ये समावेश झाल्यास मोठ्या गुंतवणुकीची शक्यता आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीला ३५.६ कोटी डॉलरची गुंतवणूक मिळण्याचा अंदाज जेएम फायनान्शिअलने व्यक्त केला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Finance Share Price Saturday 18 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(60)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x