20 January 2025 6:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO 8th Pay Commission | सरकारी क्लार्क पासून मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत इतका पगार आणि पेन्शन वाढणार, ग्रेड प्रमाणे रक्कम जाणून घ्या Penny Stocks | 94 पैशाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, सतत अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 511700 IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय शेअर Gold Rate Today | बापरे, लग्नसराईच्या हंगामात सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Vodafone Idea Share Price | पेनी शेअर रॉकेट तेजीत, 5 दिवसात 25 टक्के कमाई, पुढेही मालामाल करणार - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनी शेअर तुफान तेजीत असल्याचं पाहायला मिळतंय. सोमवारी सुद्धा व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता. शॉर्ट टर्ममध्ये व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना मजबूत परतावा दिला आहे. सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग सुरु होताच शेअरमध्ये रॉकेटसारखी तेजी पाहायला मिळाली.

व्होडाफोन आयडिया शेअरमधील तेजीचे कारण

केंद्र सरकार टेलिकॉम कंपन्यांना मोठा दिलासा देऊ शकते असे संकेत मिळू लागल्याने व्होडाफोन आयडिया शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. टेलिकॉम कंपन्यांचा समायोजित सकल महसूल माफ करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याची बातमी प्रसिद्ध होताच व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये तेजी सुरु झाली आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा व्होडाफोन आयडियाला होणार

केंद्र सरकारच्या अपेक्षित निर्णयाचा सर्वाधिक फायदा आर्थिक संकटात अडकलेल्या व्होडाफोन आयडिया कंपनीला होणार आहे. केंद्र सरकार टेलिकॉम कंपन्यांच्या ५० टक्के एजीआर थकबाकीपैकी १०० टक्के रक्कम दंड आणि व्याजासह माफ करण्याचा विचार असल्याचे वृत्त आहे. गेल्या वर्षी व्होडाफोन आयडिया कंपनीचा एजीआर 7,507.65 कोटी रुपये होता, जो 4.39 टक्क्यांनी वाढून 7,836.98 कोटी रुपयांवर पोहोचला होता.

अवघ्या 5 दिवसात 25.50 टक्के तेजी

मागील काही दिवसांपासून व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरमध्ये तुफान तेजी दिसून आली आहे. गेल्या पाच दिवसात व्होडाफोन आयडिया कंपनी शेअर्समध्ये 25.50 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरने मागील एका महिन्यात गुंतवणूकदारांना 35 टक्के परतावा दिला आहे.

गेल्या सहा महिन्यांत व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये 37.13 टक्क्यांची घसरण झाली होती. तर मागील एका वर्षाच्या कालावधीत हा शेअर 30.63 टक्क्यांनी घसरला होता. मात्र मागील पाच वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना 65.12 टक्के परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price Monday 20 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(151)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x