21 January 2025 12:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL

HFCL Share Price

HFCL Share Price | सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी सकारात्मक जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक सोमवारी हिरव्या रंगात बंद झाले. एनएसई निफ्टी 23350 च्या आसपास मजबूत बंद झाला होता. दरम्यान, पीएल कॅपिटल रिसर्च ब्रोकरेज फर्मने एचएफसीएल म्हणजे हिमाचल फ्यूचरिस्टिक कम्युनिकेशन्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

एचएफसीएल कंपनी शेअरची सध्याची स्थिती

सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी एचएफसीएल कंपनी शेअर 1.49 टक्क्यांनी वाढून 105.30 रुपयांवर पोहोचला होता. एचएफसीएल कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 171 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 80.25 रुपये होती. एचएफसीएल कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 15,213 कोटी रुपये आहे.

पीएल कॅपिटल रिसर्च ब्रोकरेज फर्मने दिले तेजीचे संकेत

पीएल कॅपिटल रिसर्च ब्रोकरेजच्या मते, ‘गेल्या 4 महिन्यांत एचएफसीएल कंपनी शेअर 171 रुपयांच्या पातळीपासून मजबूत घसरला आहे. अलीकडेच शेअरने 92 झोनमधून बाहेर पाडण्याचे संकेत दिले आहेत. शेअरने लॉन्ग टर्म ट्रेंडलाइन सपोर्ट कायम ठेवला आहे. पुढे एचएफसीएल शेअरमध्ये तेजी अपेक्षित आहे, कारण आरएसआयने ओव्हरसोल्ड झोनमधून सकारात्मक ट्रेंड रिव्हर्सलची पुष्टी केली आहे. दैनंदिन चार्टवर सुद्धा उच्च खरेदीचे संकेत दिसत आहेत. तसेच तांत्रिकदृष्ट्या चार्ट एचएफसीएल शेअर चांगल्या स्थितीत आहे.

पीएल कॅपिटल रिसर्च ब्रोकरेज फर्मने टेलिकॉम-इन्फ्रा कंपनी एचएफसीएल लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजने एचएफसीएल कंपनी शेअरसाठी १२७ रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. ब्रोकरेजने गुंतवणूकदारांना ९७ रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. ही टार्गेट प्राईस शेअरच्या सध्याच्या पातळीपेक्षा २२ टक्क्यांनी अधिक आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HFCL Share Price Monday 20 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

HFCL Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x