23 January 2025 7:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771 Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATAPOWER Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा Salary Vs Saving Account | सॅलरी आणि बचत खात्यात नेमका फरक काय, व्याजदर आणि मिनिमम बॅलेन्सचे नियम लक्षात ठेवा
x

SBI Mutual Fund | कमालच करतेय 'ही' SBI म्युच्युअल फंड योजना, मिळेल 4 पटीने परतावा, सेव्ह करून ठेवा ही योजना

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | सध्याच्या घडीला बहुतांश व्यक्ती म्युच्युअल फंडांमध्ये एस आय पी च्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवत आहेत. आतापर्यंत गुंतवणूकदारांनी बाजारातील विविध म्युच्युअल फंडांत आपले पैसे गुंतवले आहेत. असाच एक एसबीआयचा भन्नाट म्युच्युअल फंड आहे ज्याने केवळ 5 वर्षांच्या कालावधीत 1 लाख रुपयांचे 4 लाख रुपये बनवले आहेत. नेमका कोणता आहे हा म्युच्युअल फंड जाणून घेऊया सविस्तर.

एसबीआय हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंड :

एसबीआयचा हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंड गेल्या काही दिवसांपासून अत्यंत लोकप्रिय ठरत चालला आहे. बरेच गुंतवणूकदार एसबीआयच्या या खास फंडामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दर्शवत आहेत. या फंडामध्ये 5 वर्षांसाठी गुंतवलेल्या 1 लाख रुपयांचे 4 लाख रुपयांमध्ये रूपांतर झाल्याचे पाहायला मिळत आहे.

अशा पद्धतीने एसबीआयच्या फंडाची कामगिरी राहिली असती :

1. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी एसबीआयच्या हेल्थकेअर ऑपॉर्च्युनिटीज फंडात
1 लाख रुपयांची रक्कम गुंतवली असती तर, सध्याच्या घडीला त्याचे व्हॅल्युएशन 4 लाख रुपयांपर्यंत झाले असते.

2. त्याचबरोबर 5 वर्षांसाठी 10,000 रुपयांची एसआयपी मासिक गुंतवणूक केली असती तर, आज त्याचे मूल्य अंदाजपंचे 12 लाख रुपयांपेक्षाही जास्त झाले असते.

3. त्याचबरोबर गुंतवणूकदारांनी 1 लाख रुपयांची रक्कम गुंतवली असता पुढील 5 वर्षांमध्ये सरासरी वार्षिक परतावा 32.90% मिळाला असता. म्हणजेच तुम्ही गुंतवलेल्या 1 लाख रुपयांचे मूल्य 4,14,596 रुपये झाले असते. 4 लाखांपेक्षाही तुम्हाला जास्तीची रक्कम मिळाली असती.

4. पुढील 5 वर्षांसाठी एसआयपी गुंतवणुकीचे मूल्य थेट 12.80 लाख रुपये झाले असते. फार कमी व्यक्तींना ही गोष्ट ठाऊक आहे की, एसबीआय हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंड ही योजना फार्मासूटिकल त्याचबरोबर हेल्थकेअर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून परतावा मिळवून देते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SBI Mutual Fund Thursday 23 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(164)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x