23 January 2025 7:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771 Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATAPOWER Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा Salary Vs Saving Account | सॅलरी आणि बचत खात्यात नेमका फरक काय, व्याजदर आणि मिनिमम बॅलेन्सचे नियम लक्षात ठेवा
x

Business Idea | 'हे' 4 प्रकारचे व्यवसाय सुरू करा ; लाखोंच्या घरात पैसे कमवाल ; इथे पहा पूर्ण डिटेल्स

Business Idea

Business Idea | बहुतांश तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो. स्वतःच्या व्यवसायात व्यक्ती अगदी मनसोक्तपणे काम करू शकतो. व्यक्तींकडे व्यवसायाला लागणारे भरपूर पैसे तर असतात परंतु नेमका कोणता व्यवसाय करावा या गोष्टीची आयडिया नसते. आज आम्ही तुम्हाला एकूण 4 प्रकारच्या भन्नाट बिझनेस आयडिया सांगणार आहोत.

1. ई-कॉमर्स साईट :

आज कालच्या या डिजिटल युगात सर्वच गोष्टी ऑनलाइन माध्यमातून होतात. अगदी आपल्याला भाज्या जरी विकत घ्यायच्या असल्या तरीही आपण ऑनलाईन पद्धतीने अगदी घरपोच भाजीपाला मागवू शकतो. याचप्रमाणे कपडे, दाग दागिने आणि इतर सर्व प्रकारच्या गोष्टी बहुतांश व्यक्ती घरबसल्या ऑर्डर करतात. सध्या ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, शॉप्सी, मंत्रा, मीशो, नायका यासारख्या बऱ्याच वेबसाईट ई-कॉमर्स साइटवर उपलब्ध आहेत. तुम्ही तुमचे उत्पादन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विकण्यास लावू शकता आणि महिन्याला भरपूर कमाई देखील करू शकता.

2. फूड डिलिव्हरी :

खास करून महिलांना त्याचबरोबर पुरुषांना देखील जेवण बनवण्याची आवड असते. आपल्या हातातच चविष्ट जेवण प्रत्येक व्यक्तीने चाखावं अशी त्यांची इच्छा असते. बऱ्याच व्यक्तींना स्वतःचे छोटे रेस्टॉरंट किंवा फूड बिजनेस करण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असते. तुम्ही अगदी कमी पैशांत घरूनच फूड डिलिव्हरी त्याचबरोबर घरपोच डबा बनवणे यांसारखे छोटे बिजनेस सुरू करून नंतर रेस्टॉरंट देखील उघडू शकता. सध्याच्या घडीला zomato त्याचबरोबर स्विगी यांसारखे ऑनलाईन खाद्यपदार्थांचे प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्ही याद्वारे देखील तुमच्या उत्पादकाची विक्री करू शकता.

3. हेल्थकेअर फिटनेस क्लब :

बदलत्या जीवनशैलीमुळे बहुतांश व्यक्तींच्या खाणपानाच्या पद्धती चुकल्यामुळे त्यांचे वजनावर नियंत्रण राहिलेले नाही. काहींना शरीरसंबंधी बऱ्याच समस्या उद्भवतात. अशावेळी कोणताही व्यक्ती नक्कीच फिटनेस क्लब किंवा जिमसारखे पर्याय निवडत आहे. तुमच्याकडे पैसे आणि चांगली जागा असेल तर, तुम्ही एखादा फिटनेस क्लब उघडण्याचा विचार करू शकता. या माध्यमातून देखील तुम्ही महिन्याला 20 ते 25,000 रुपयांपर्यंत पैसे कमवू शकता.

4. ट्रॅव्हल अँड टुरिझम :

आजकाल दूरच्या ठिकाणी फिरण्यास व्यक्ती स्वखर्चाने तर, प्रवास करतेच. परंतु फिरताना काही गोष्टी व्यवस्थित न समजत असल्यामुळे बऱ्याच व्यक्ती ट्रॅव्हल आणि टुरिझम कंपन्यांची मदत घेतात. त्यांच्या थ्रू फिरायला गेल्यानंतर आपल्याला पूर्ण पॅकेज देखील मिळते. त्यामुळे तुम्ही ट्रॅव्हल आणि टुरिझम एजन्सी खोलू शकता आणि बक्कळ पैसे कमावू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Business Idea Thursday 23 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Business Idea(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x