23 January 2025 9:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771 Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATAPOWER Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
x

IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर फोकसमध्ये आला, तज्ज्ञांकडून मोठे संकेत - NSE: IREDA

IREDA Share Price

IREDA Share Price | गुरुवार, 23 जानेवारी 2025 रोजी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअर 1.48 टक्क्यांनी घसरून 197.30 रुपयांवर पोहोचला होता. आता इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने महत्वाची अपडेट दिली आहे. या अपडेटचा परिणाम स्टॉक प्राईसवर देखील होणार आहे.

इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 52,949 कोटी रुपये आहे. इरेडा कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 310 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 121.05 रुपये होती.

इरेडा कंपनी शेअरची ट्रेडिंग रेंज

‎1 डिसेंबर 2023 रोजी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअर 62.75 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या इरेडा कंपनी शेअर 197.05 रुपयांवर ट्रेड करतोय. शेअरची बुधवारची बंद किंमत 200.26 रुपये होती. गुरुवारी दिवसभरात इरेडा कंपनी शेअर 195.03 रुपये ते 195.03 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता. मागील एक वर्षात इरेडा कंपनी शेअर 121.05 रुपये ते 310 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.

इरेडा कंपनीने दिली अपडेट

इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. गुरुवारी इरेडा लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. १७ जानेवारीला स्टॉक मार्केट बंद झाल्यानंतर इरेडा कंपनीने संचालक मंडळाच्या बैठकीबाबत स्टॉक एक्स्चेंजला माहिती दिली. गुरुवारी होणाऱ्या कंपनी संचालक मंडळाच्या बैठकीत पात्र संस्था प्लेसमेंट म्हणजे क्यूआयपी बाबत महत्वाचा निर्णय घेण्यात येईल, असे इरेडा कंपनीने फायलिंगमध्ये म्हटले आहे.

गेल्या वर्षी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीला केंद्र सरकारकडून ४५०० कोटी रुपयांचा निधी उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती. इरेडा कंपनीला नवीन इक्विटी जारी करून ४५०० कोटी रुपयांचा निधी उभारण्याची परवानगी देण्यात आली होती.

तज्ज्ञांचे इरेडा शेअरबाबत संकेत

शेअर बाजार तज्ज्ञांनी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी शेअरसाठी २४० रुपये ही पहिली टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे, मध्यम कालावधीत इरेडा शेअरने २४० रुपयांची पातळी ओलांडताच तो वर्षभरात ३०० रुपये टार्गेट प्राईसपर्यंत वाढू शकतो. त्यासाठी एक वर्ष ते दीड वर्षात कालावधी लागू शकतो असं विश्लेषकांनी म्हटलं आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये हा स्टॉक ४२५ रुपयांच्या टार्गेट प्राईसपर्यंत पोहोचू शकतो असं अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price Thursday 23 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(144)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x