28 January 2025 9:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

Post Office Schemes | दररोज 100 रुपये वाचवून पोस्टाच्या 'या' भन्नाट योजनेत गुंतवा, मिळेल लाखो रुपयात परतावा

Post Office Schemes

Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या योजना या सरकारी योजना असतात. तुम्ही पोस्टाच्या योजनांमध्ये पैसे गुंतवून दीर्घकालात अगदी लाखो रुपयांची बचत किंवा गुंतवणूक करू शकता. केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला घसघशीत परतावा देखील मिळेल. आम्ही पोस्टाच्या अशाच एका घसघशीत परतावा मिळवून देणाऱ्या योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत.

पोस्ट ऑफिस आरडी योजना :

पोस्टाची आरडी योजना ही एक प्रकारची पिगी बँकच असते. ज्या व्यक्तींना कमीत कमी पैशांची बचत करून दीर्घकाळात मोठा फंड तयार करायचा असेल त्यांच्यासाठी पोस्टाची 5 वर्षांची आरडी योजना अत्यंत फायद्याची ठरू शकते. आतापर्यंत बऱ्याच गुंतवणूकदारांनी योजनेचा लाभ मिळवला आहे.

दररोज गुंतवा 100 रुपये :

पोस्टाच्या आरडी योजनेत तुम्ही 5 वर्षांमध्ये दररोज 100 रुपयांची गुंतवणूक करून मोठा निधी जमा करू शकता. दिवसाला केवळ 100 रुपयांची बचत करून तुम्हाला 2,14,097 रुपयांची मोठी बचत करता येणार आहे. पोस्टाच्या सर्वच योजना तुम्हाला सुरक्षा प्रदान करतात त्याचबरोबर मोठा निधी तयार करण्यास मदत करतात.

किती पैसे जमा होतील :

समजा तुम्ही पोस्टाच्या 5 वर्षांच्या आरडी योजनेमध्ये प्रत्येक दिवसाला 100 रुपयांची बचत करत असाल तर, महिन्याला 3000 रुपयांची बचत कराल. महिन्याला 3000 म्हणजेच वर्षाला तुम्ही 36000 रुपयांची गुंतवणूक करता. अशा पद्धतीने तुमच्या खात्यात एकूण 5 वर्षांमध्ये 1 लाख 80 हजार रुपयांची रक्कम जमा होते.

योजनेचे व्याजदर किती :

पोस्टाची आरडी योजना तुम्हाला वार्षिक आधारावर 6.7% दराने व्याजदर प्रदान करते. 6.7% व्याजदराप्रमाणे 34,097 रुपये व्याज स्वरूपी मिळतात. याचाच अर्थ 5 वर्षांच्या मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम 2,14,097 रुपये असते. अशा पद्धतीने तुम्ही छोट्या रक्कमेची गुंतवणूक करून मोठा निधी जमा करू शकता आणि आपले भविष्य सुरक्षित करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Schemes Saturday 25 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Post Office Schemes(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x