26 April 2025 4:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 27 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 27 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, 46 रुपयांच्या शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRB NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC HUDCO Share Price | सरकारी कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, पुढे मिळेल मोठा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO AWL Share Price | अदानी वील्मर शेअरमध्ये जबरदस्त तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: AWL HAL Share Price | मंदीत संधी, हा डिफेन्स कंपनीचा शेअर खरेदी करा, ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: HAL
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 42 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सोमवार, 27 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर 4.17 टक्क्यांनी घसरून 50.35 रुपयांवर पोहोचला होता. सलग पाचव्या दिवशी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. मागील ५ दिवसात सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये 13.46 टक्क्यांची घसरण झाली आहे.

शेअर्स आतापर्यंत 42 टक्क्यांनी खाली घसरला

सोमवार, 27 जानेवारी 2025 रोजीच्या घसरणीमुळे सुझलॉन एनर्जी शेअर ५० रुपयांच्या खाली म्हणजे 49.91 रुपयांवर पोहोचला होता. जून २०२४ नंतर पहिल्यांदाच सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स या नीचांकी पातळीपर्यंत खाली घसरले आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये सुझलॉन एनर्जी शेअरने 86 रुपयांच्या उच्चांकी पातळी गाठली होती आणि त्या पातळीवरून शेअर्स आतापर्यंत 42 टक्क्यांनी खाली घसरला आहे. त्यामुळे सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांची चिंता अधिक वाढली आहे.

सुझलॉन कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला

सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला नुकताच टोरंट पॉवर कंपनीकडून ४८६ मेगावॅटची नवीन कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. हा कॉन्ट्रॅक्ट पार्टनरशिप अंतर्गत पूर्ण केला जाणार असल्याची माहिती कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिली आहे. या पार्टनरशिप अंतर्गत सुझलॉन कंपनीला प्राप्त झालेला हा पाचवा कॉन्ट्रॅक्ट आहे. मात्र पार्टनरशिप संबंधित अधिक अपडेट देण्यात आलेली नाही.

रिटेल गुंतवणूकदारांकडून अजूनही खरेदी

एकाबाजूला सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये घसरण सुरु असली तरी रिटेल गुंतवणूकदारांची आकडेवारी सकारात्मक संकेत देत आहे. डिसेंबर तिमाही अखेर आलेल्या आकडेवारीनुसार दोन लाख रुपयांपर्यंत अथोराइज्ड कॅपिटल असलेल्या रेटीएल गुंतवणूकदारांची संख्या वाढून 54.1 लाख झाली आहे, सप्टेंबर तिमाहीत ही आकडेवारी 49.38 लाख होती. अशा प्रकारे सुमारे ५ लाख नवीन किरकोळ गुंतवणूकदार सुझलॉन कंपनीशी जोडले गेले आहेत. किरकोळ गुंतवणुकदारांचा एकूण हिस्सा २४.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो सप्टेंबर तिमाहीत २३.५५ टक्क्यांवर होता.

डिसेंबर तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीतील म्युच्युअल फंडांची हिस्सेदारी ४.४४ टक्क्यांवर स्थिर राहिला आहे, जी सप्टेंबर तिमाहीत ४.१४% होती. तसेच विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या हिस्सेदारीत २३.७२ टक्क्यांवरून थोडी घसरून होऊन ती २२.८८ टक्क्यांवर पोहोचली आहे.

सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांनी काय म्हटले

सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरसाठी 6 स्टॉक मार्केट विश्लेषकांपैकी चार विश्लेषकांनी खरेदीचा सल्ला दिला आहे. तर दोन विश्लेषकांनी या शेअरसाठी ‘SELL’ रेटिंग दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price Monday 27 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या