19 April 2025 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

Home Loan Benefits | गृहकर्ज घेणाऱ्या व्यक्तींसाठी आनंदाची बातमी, आता अगदी सोप्या पद्धतीने करा कर्जाची परतफेड

Home Loan Benefits

Home Loan Benefits | भारतीय रिझर्व बँक आपल्या ग्राहकांसाठी कायम नवनवीन सुविधा घेऊन येत असते. सध्या भारतीय रिझर्व बँकेने आपल्या गृहकर्ज धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या मोठ्या निर्णयानंतर कर्ज घेतलेल्या ग्राहकांसाठी कर्ज परतफेडकरीता अत्यंत सोपी प्रक्रिया केली जात आहे. वाढता गृहकर्ज बाजार लक्षात घेता आरबीआयचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

आरबीआयने घेतलेल्या निर्णयाचा उद्देश नेमका काय आहे :

आरबीआयने गृह कर्जाविषयीचा महत्त्वाचा निर्णय ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी घेतला आहे. मागील काही वर्षांपासून कर्जदारांचे व्याजदर प्रचंड प्रमाणात वाढले आहे. या सर्व गोष्टींमुळे कर्जदाराच्या डोक्यावरचा ताण कमी होत नाहीये आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ग्राहकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. याच कारणामुळे आरबीआयने काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये बदल घडवून आणले आहेत.

आरबीआयने कोणत्या नवीन नियमांत सुधारणा केली आहे :

1. प्रत्येक ग्राहकाच्या सोयीनुसार योजना : आरबीआयच्या निर्णयामध्ये बँकांना आपल्या ग्राहकांच्या सोयीनुसार आणि त्यांच्या गरजा ओळखून, त्याचबरोबर त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा संपूर्णपणे अभ्यास करूनच योजना निर्देश करण्याचे आदेश दिले आहेत.

2. आर्थिक लवचिकता : कर्जदारांच्या आर्थिक गोष्टी लक्षात घेऊनच कर्ज परतफेडची तरतूद आखली जाईल. त्याचबरोबर कर्जाच्या परतफेडीची लवचिकता देखील केली जाईल. ज्या कर्जदारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे अशा व्यक्तींना मोठा दिला मिळणार आहे.

3. परतफेडचा कालावधी वाढवला जाणार आहे : कर्जाची परतफेड करण्यासाठी कर्जदारांना एक अत्यंत मोठी सुविधा दिली जाणार आहे. त्यांना कर्जाचा कालावधी वाढवून मिळणार आहे. अशा परिस्थितीत आर्थिक ईएमआयचा ताण आपोआपच कमी होणार आहे.

4. गृह कर्ज घेणे सुलभ प्रक्रिया होईल : आरबीआयने हा बदल केल्यामुळे नवीनच गृहकर्ज घेणाऱ्या व्यक्तींसाठी ही गोष्ट अत्यंत फायद्याची ठरणार आहे. त्याचबरोबर कर्ज प्रक्रिया देखील अगदी सुलभ पद्धतीने होणार आहे.

5. मासिक हप्त्याचा ताण कमी होईल : परतफेडचा कालावधी वाढवल्या गेल्यामुळे कर्जदार आपल्या आर्थिक गरजा भागवून कमी पैशांचा ईएमआय भरू शकेल. या कारणामुळे मासिक खर्चाचा ताण तणाव थोडाफार प्रमाणात कमी होईल.

गृहकर्ज घेताना कोणती काळजी घ्याल :

तुम्ही गृहकर्ज घेत असाल तर, सर्वप्रथम व्याजदराविषयी, परतफेडीविषयी, अतिरिक्त शुल्क या सर्व गोष्टींविषयी व्यवस्थित माहिती करून घ्या. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आर्थिक बजेटनुसार गृहकर्ज निवडा. कर्ज परतफेड करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी तुमच्या बँकेची थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न करा आणि एक पक्की डील करून ठेवा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Home Loan Benefits Wednesday 29 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Home Loan Benefits(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या