5 February 2025 4:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: APOLLO HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259
x

EPFO Passbook | खाजगी पगारदरांनो इकडे लक्ष द्या, EPF रक्कमेवर मिळणार अधिक व्याज, ईपीएफओ अपडेट जाणून घ्या

EPFO Passbook

EPFO Passbook | खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प बजेट 2025-26 सादर केला आहे. या अर्थसंकल्पात खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे नशीब फळफळणार आहे. कारण की सामान्य नोकरदार वर्गाला दिलासा मिळवून देण्यासाठी 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. अधिक सूट मिळाल्यामुळे ईपीएफओ खातेधारकाला जास्तीचे व्याज मिळण्याची देखील शक्यता दर्शवली जात आहे.

सीबीटी बैठक :
येत्या 28 फेब्रुवारी 2025 रोजी ईपीएफओ केंद्रीय स्टेट बोर्डची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत अनेक निर्णय घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर एका अधिकृत सूचनेमध्ये सांगितल्याप्रमाणे “ईपीएफच्या सीबीटीची 237 वी बैठक 28 फेब्रुवारी रोजी पार पडण्यात येणार आहे”. बहुतांश व्यक्तींना सीबीटी म्हणजे काय हे ठाऊक नसते. सीबीटी म्हणजेच ईपीएफओ संस्थेची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था. मागील वर्ष 2024 मध्ये सीबीटी बैठक 30 नोव्हेंबर या तारखेला पार पाडण्यात आली होती.

व्याजदराविषयी माहिती जाणून घ्या :
2022-23 वर्षाच्या तुलनेत 0.10% दराने व्याजदर दिला जात होता. त्यानंतर आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 8.25% टक्के दराने व्याजदर दिले जात होते. त्यामुळे याही वर्षी नोकरदारांचे ईपीएफ मधील व्याजदर वाढवली जाण्याची शक्यता दर्शवली जात आहे. वार्षिक अहवालानुसार 2022 आणि 2023 साली 7.18 लाखांहून योगदान देणाऱ्यांची संख्या 6.6% वरून वाढून 7.66 लाख झाली.

2022-23 मध्ये ही संख्या 6.85 कोटी होती. 2023-24 सलात ही संख्या 7.33 कोटी झाली असून 2025 मधील सरकार खातेधारकांसाठी लवकरात लवकर एटीएममधून पैसे काढण्याची एटीएम कार्ड सारखी सेवा सुरू करण्याच्या जोरदार तयारीत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Passbook Wednesday 05 February 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPFO Passbook(36)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x