6 February 2025 9:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरमध्ये सलग 4 दिवस तेजी, ब्रोकरेज बुलिश, 305 रुपये टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN Post Office Scheme | पोस्टाच्या 'या' योजनेत वर्षाला गुंतवा 1 लाख रुपये, व्याजाने दुप्पट पैसे कमवाल, संपूर्ण कॅल्क्युलेशन पहा Penny Stocks | 4 ते 17 रुपयांचे 5 पेनी शेअर्स, रोज मोळतोय 10 ते 20 टक्के परतावा, मार्ग श्रीमंतीचा ठरू शकतात EPFO Pension Money | उच्च पेन्शन घेणाऱ्यांसाठी मोठी अपडेट, ईपीएफओ'ने 21,885 पेन्शन पेमेंट ऑर्डर जारी केले RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर मालामाल करणार, रेटिंग अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL IRFC Share Price | रेल्वे कंपनी आयआरएफसी शेअर्स फोकसमध्ये, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Mutual Fund SIP | महिन्याला करा केवळ 6000 रुपयांची गुंतवणूक, 1 कोटींच्या घरात परतावा कमवाल, संपूर्ण कॅल्क्युलेशन
x

Mutual Fund SIP | महिन्याला करा केवळ 6000 रुपयांची गुंतवणूक, 1 कोटींच्या घरात परतावा कमवाल, संपूर्ण कॅल्क्युलेशन

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | वाढत्या महागाईच्या काळात बऱ्याच व्यक्तींचे लक्ष भविष्य सुरक्षित करण्याकडे लागले आहे. पगारातील एक ठराविक रक्कम प्रत्येक महिन्या एखाद्या चांगल्या व्याजदर देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवून चांगला परतावा कमवावा असं प्रत्येकाला वाटतं. तुम्ही म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून एसआयपी गुंतवणूक करू शकता आणि तुमचं त्याचबरोबर तुमच्या कुटुंबीयांचं भविष्य सुरक्षित करू शकता.

गुंतवणुकीचा जबरदस्त पर्याय :
SIP हा गुंतवणुकीचा एक जबरदस्त पर्याय आहे. म्युच्युअल फंडात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणे हे अत्यंत कमी जोखीमेचे असते. म्युच्युअल फंडांच्या योजना या थेट बाजाराची निगडित जरी असल्या तरीसुद्धा शेअर मार्केटप्रमाणे मोठी जोखीम उचलावी लागत नाही. आज आम्ही तुम्हाला बातमीपत्रातून 6000 रुपयांची गुंतवणूक करून 1 कोटींचा मोठा फंड कसा काय तयार होऊ शकतो याबद्दल माहिती सांगणार आहोत.

6000 रुपयांची गुंतवणूक करून 1 कोटींचा निधी तयार होण्यासाठी किती वर्षे लागतील :
1. एसआयपी गुंतवणूक ही एक अत्यंत महत्त्वाच्या गुंतवणुकीच्या पर्यायांपैकी एक आहे. एसआयपी गुंतवणूक तुम्हाला 12% टक्के दराने व्याजदर देते. जे इतर कोणत्याही योजनेच्या किंवा बँकांच्या एफडी व्याजदरापेक्षा अधिक आहे.

2. समजा एखाद्या व्यक्तीने म्युच्युअल फंडांत 6000 रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली तर, 1 कोटींचा निधी तयार होण्यासाठी 24 वर्षांचा कार्यकाळ लागेल.

3. गुंतवणुकीमध्ये सातत्य असेल तर, कंपाऊंड आणि चक्रवाढ व्याजाचा देखील फायदा मिळतो. तुम्ही 6000 मासिक एसआयपीने 24 वर्षांमध्ये 1,00,36,123 रुपयांचा निधी तयार करू शकता.

4. 6000 रुपयांच्या हिशोबाने तुम्ही गुंतवलेली रक्कम 17,28,000 असेल आणि तुम्ही व्याजाने कमवलेले पैसे 83,08,123 रुपये एवढे असेल.

5. एसआयपी गुंतवणुकीच्या काही गोष्टी कायम लक्षात ठेवा. एसआयपीमध्ये तुम्हाला मिळणारा परतावा हा निश्चित नसतो. बाजारातील चढ-उतारांवर आधारित असल्याकारणाने तुम्हाला कधी जास्त तर कधी कमी परतावा मिळू शकतो. काहीवेळा तुम्हाला 20% टक्क्यांनी देखील परतावा मिळू शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Mutual Fund SIP Thursday 06 February 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(264)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x