22 February 2025 2:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स
x

EPFO Passbook | खाजगी पगारदारांसाठी खुशखबर, EPF व्याजदर वाढणार, 7 कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा

EPFO Passbook

EPFO Passbook | EPFO म्हणजेच ‘कर्मचारी भविष्या निधी संघटन’ अंतर्गत सर्व नोकरदारांच्या प्रॉव्हिडंट फंड गुंतवणुकीवर किती व्याजदर मिळणार हे निश्चित केलं जातं. जो व्यक्ती नोकरीला असतो त्याच्या पगारातील एक ठराविक रक्कम पीएफ खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाते. या पैशांवर खातेधारकाला व्याजदर मिळत जाते आणि त्याच्याजवळ रिटायरमेंटपर्यंत मोठा फंड तयार होण्यास मदत होते. दरम्यान सगळीकडे अशी चर्चा होत आहे की, लवकरच सरकारकडून पीएफ खात्याचे व्याजदर वाढवले जाणार आहेत.

येत्या आठवड्यात पार पडणार महत्त्वाची बैठक :
2024-25 वर्षात ईपीएफ खातेधारकांसाठी ईपीएफओने 8.25% व्याजदर निश्चित केले आहे. अजून या कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही परंतु लवकरच व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल अशी दाट शक्यता दर्शवली जात आहे. येत्या आठवड्यात ऑडिट कमिटी आणि एम्पलोयी प्रॉव्हिडेंट फंड ऑर्गनायझेशनच्या इन्व्हेस्टमेंट फायनान्सची एक महत्त्वाची बैठक या आठवड्यामध्ये पार पडणार आहे.

पार पडणाऱ्या बैठकीत एम्पलोयी प्रॉव्हिडंट फंडावर किती व्याजदर मिळायला हवे हे निश्चित केले जाणार आहे. याबाबतीत अखेरचा निर्णय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मंडवीया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. दरम्यान बैठकीमध्ये व्याजदर निश्चित झाल्यानंतर लगेचच अर्थमंत्रालयाकडे ठरवलेला प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

वेगवेगळ्या वर्षांचे व्याजदर तपासा :
साल 2021-22 मध्ये एम्पलोयी प्रोव्हिडंट फंडाचे व्याजदर 8.10% होते. 2022-23 मध्ये 8.15% आणि 2023-24 मध्ये 8.25% व्याजदर निश्चित करण्यात आले होते. यंदाच्या वर्षी देखील ईपीएफओने खातेधारक लवकरात लवकर चांगले व्याजदर मिळवू शकणार आहेत असे समजले आहे. गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवलेल्या पैशांवर मजबूत परतावा मिळणार आहे.

एकूण 7 कोटी सदस्यांना होणार फायदा :
सध्याच्या घडीला ईपीएफओचे सबस्क्राईबर्स 7 कोटींपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे ईपीएफओच्या वाढत्या व्याजदराचे फायदे तब्बल 7 कोटी खातेधारकांना अनुभवता येणार आहेत. ईपीएफ खात्यामध्ये कर्मचारी आपल्या पगारातून काही भाग फंडामध्ये गुंतवत असतो आणि कर्मचाऱ्या एवढेच योगदान कंपनीकडून देखील केले जाते.

कर्मचारी गुंतवत असलेले पैसे नोकरी सोडून गेल्यावर किंवा घर खरेदी, मुलांचे लग्न, शिक्षण आणि इतर कोणत्याही मोठ्या कारणांसाठी पीएफ खात्यातील पैसे काढू शकतो. सध्या क्लेम सेटलमेंटचा इतिहास देखील उत्तम रचला आहे. त्यामुळे ईपीएफओ खातेदार सर्व गोष्टीतून निश्चित झाला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPFO Passbook(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x