18 April 2025 1:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Shukra Rashi Parivartan | शुक्र अस्त आणि उदय होणार, या 3 नशीबवान राशींच्या नशिबाचा उदय होणार, तुमची राशी कोणती

Shukra Rashi Parivartan

Shukra Rashi Parivartan | ऐशोआराम, संपत्ती आणि ऐश्वर्य यांचा कारक असलेला शुक्र ग्रह ठराविक कालावधीत राशी बदलतो. राशीव्यतिरिक्त शुक्र आपले नक्षत्र, गती आणि अवस्थाही बदलतो. मार्च मध्ये शुक्र आपल्या उच्च राशीमीन राशीत अस्त आणि उगवणार आहे.

शुक्र अस्त होण्याचा आणि उदयाचा प्रभाव मेष ते मीन राशीपर्यंत जाणवेल. काही भाग्यवान राशींना नशिबाचा आशीर्वाद मिळेल आणि शुक्र अस्त झाल्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक यश प्राप्त होईल. शुक्र अस्त आणि उदयाचा कोणत्या राशींना होईल फायदा जाणून घ्या.

द्रिक पंचांगानुसार शुक्र 19 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता अस्त होईल आणि 23 मार्च 2025 रोजी पहाटे 5 वाजून 52 मिनिटांनी उदय होईल. मार्च मध्ये शुक्र 4 दिवसांसाठी अस्त होईल.

शुक्राच्या अस्तीमुळे कोणत्या राशींवर सकारात्मक प्रभाव पडणार

मेष राशी
शुक्र मेष राशीच्या बाराव्या भावात असेल. शुक्राच्या प्रभावामुळे अनेक आर्थिक बाबतीत विजय प्राप्त होईल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. लांब पल्ल्याच्या प्रवासाची संधी मिळू शकते. विशेष म्हणजे कौटुंबिक अर्थकारण सकारात्मक दिशेने तेजीने पावलं टाकण्यास सुरुवात करेल.

सिंह राशी
सिंह राशीच्या आठव्या भावात शुक्र अस्त होणार आहे. शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात धन आणि समृद्धी वाढेल. आर्थिक आनंदाचे आगमन होईल. कुटुंबासमवेत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल. लक्झरी वस्तूंची खरेदी करू शकता. रखडलेली कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. नशीब अर्थकारणाची दरवाजे खुले करेल.

वृषभ राशी
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राची स्थिती अनुकूल मानली जाते. शुक्र अस्त झाल्याने कौटुंबिक बाजूने संबंध सुधारू शकतात. शत्रूंवर वर्चस्व राहील. न्यायालयीन प्रकरणांमध्ये विजय प्राप्त होईल. व्यावसायिक परिस्थिती मजबूत होईल. अनेक खोळंबलेले आर्थिक प्रश्न सुटतील. कुटुंबात धनाचे आगमन होईल. एखादी सुखद बातमी मिळू शकते आणि नशिबाला सरकात्मक कलाटणी मिळू शकते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shukra Rashi Parivartan(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या