21 February 2025 5:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Loan EMI Alert | कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडायचं आहे, EMI भरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

Loan EMI Alert

Loan EMI Alert | आजकाल प्रत्येक व्यक्तीच्या गरजा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. बाजारातील सर्वच गोष्टींना मोठ्या प्रमाणात भाव आलेला आहे आणि याच कारणामुळे अगदी लहान वस्तू खरेदी करायची झाली तरीही सर्वसामान्य व्यक्तींना जास्तीचे पैसे खर्च करावे लागत आहे.

बहुतांश व्यक्ती खर खरेदी करण्यासाठी गृह कर्ज किंवा गाडी खरेदी करण्यासाठी कार लोन यांसारखे वेगवेगळे कर्ज घेत असतात. एकाच वेळी अनेक लोन घेतल्यामुळे EMI भरण्यास असमर्थ ठरतो आणि याचं कारणामुळे कर्जाच्या विळख्यात अडकत जातो. कोणत्या गोष्टी केल्यामुळे EMI चा बोजा कमी होऊ शकतो ते पहा.

कमीत कमी खर्च करा :
प्रत्येक महिन्याला भरावी लागणारी EMI ची रक्कम जास्त असेल तर, तुम्हाला तुमचा एक्स्ट्रा खर्च कमीत कमी करावा लागेल. कमीत कमी खर्च व्हावा यासाठी तुम्हाला महिन्याच्या सुरुवातीलाच संपूर्ण खर्चाचा बजेट तयार करावा लागेल. त्याचबरोबर तुम्हाला तुमचे काही छंद बाजूला ठेवून पैशांची जमवाजमव करावी लागेल आणि EMI भरावा लागेल.

कमाईचे स्रोत शोधा :
लवकरात लवकर EMI भरण्यासाठी तुम्हाला कमाईचे वेगवेगळे साधन शोधावे लागेल. यासाठी तुम्ही नोकरीसोबत कमाईचे इतर साधन शोधले पाहिजे. तरच तुमचे काही पैसे बाजूला पडतील आणि तुमची बचत होऊन तुमचा EMI देखील भरता येईल.

लोन रिफायनान्स :
कर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही लोन रिफायनान्स करून कमी व्याजदरातून आणि नवीन कर्जातून आपले जुने कर्ज फेडू शकता. त्याचबरोबर बऱ्याच अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आटोक्यात आणून तुम्ही तुमचा खर्च कमी करू शकता. अगदी छोट्या गोष्टीचे उदाहरण द्यायचे झाले तर तुम्ही दहा रुपयांचा एक साबण खरेदी करत असाल तर, केवळ एकच खरेदी करण्यापेक्षा संपूर्ण बॉक्स खरेदी करा. जेणेकरून तुम्हाला एका बॉक्सवर मोठा डिस्काउंट देखील देण्यात येईल. त्यानंतर साबण संपल्यावर तुम्हाला वारंवार दहा रुपये खर्च करण्याची वेळ येणार नाही आणि पैशांची देखील बचत होईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Loan EMI Alert(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x