21 February 2025 1:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

HDFC FD Interest Rates | HDFC बँकेच्या एफडीमध्ये 33,750 रुपये केवळ व्याजाने मिळतील, पैशाने पैसा वाढवा

HDFC FD Interest Rates

HDFC FD Interest Rates | परताव्याची हमी आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकांतील एफडी म्हणजे ‘फिक्स्ड डिपॉझिट’ हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो. अलीकडच्या काळात बऱ्याच बँकांनी एफडी गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे.

बहुतांश गुंतवणूकदार शेअर बाजारातील जोखीमयुक्त गुंतवणुकीपासून सुटका मिळवण्यासाठी बँकांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्याकडे वळले आहे. एचडीएफसी बँकेची एफडी देखील मालामाल करत आहे. आज आपण पाहणार आहोत की, 21 महिन्यांच्या एचडीएफसी एफडीमध्ये गुंतवणूक 2.5 लाखांची गुंतवणूक केल्यास किती वर्षांत परतावा मिळेल.

HDFC बँकेच्या 21 महिन्यांच्या एफडीचे व्याजदर :
एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना एफडी गुंतवणुकीवर मजबूत व्याजदर उपलब्ध करून देते. सध्या एचडीएफसी बँकेची एफडी 21 महिन्यांच्या गुंतवणुकीवर आपल्या ग्राहकांना 7.10% व्याजदर देत आहे. हे व्याजदर केवळ सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध आहे. ज्येष्ठांसाठी 7.60% व्याजदर एचडीएफसी एफडीवर मिळत आहे. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना मजबूत परतावा मिळण्याची शक्यता आहे.

2.5 लाखांची रक्कम गुंतवल्यास किती परतावा मिळणार :
समजा एखाद्या गुंतवणूकदाराने एचडीएफसी बँकेच्या एफडी योजनेत 2.5 लाखांची गुंतवणूक केली. त्यानंतर एक वर्ष आणि नऊ महिने म्हणजेच एकूण 21 महिन्यांचा काळ पूर्ण केल्यानंतर 2 लाख 88 हजार 750 रुपयांचा परतावा मिळेल. तुम्हाला मिळणारा हा परतावा 7.10 टक्क्यांनी असेल. तर, अडीच लाख रुपये वगळता 33,750 रुपये केवळ व्याजाने मिळतील.

ज्येष्ठांना किती मिळणार परतावा :
या गुंतवणूक योजनेत ज्येष्ठ नागरिक म्हणजेच 60 वर्ष उलटून गेलेले नागरिक गुंतवणूक करू शकतात. त्यांना सर्वसामान्यांपेक्षा जास्तीचे म्हणजे 7.60% व्याजदर मिळते. म्हणजेच 21 वर्षानंतर गुंतवणूकदाराला 2,86,500 रुपये परत मिळतील. यामधील 36,500 ही रक्कम केवळ व्याजाने कमावलेली असेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#HDFC FD Interest Rates(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x