21 February 2025 12:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Realme P3x 5G | 'हा' ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करा केवळ 15,000 रुपयांत, मिळेल प्रीमियम लेदर आणि डिझाईन देखील नवीन

Realme P3x 5G

Realme P3x 5G | प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीने काही दिवसांपूर्वीच आपल्या Realme P3x 5G याच स्मार्टफोनची घोषणा केली होती. अशातच आज म्हणजेच 18 फेब्रुवारी 2025 रोजी कंपनीने आपला प्रीमियम लेदर आणि नवीन डिझाईनसह स्मार्टफोन लॉन्च केला आहे. नुकताच हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च झाला असून स्मार्टफोनची किंमत केवळ 15000 रुपये दिली आहे. हा स्मार्टफोन यूजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशनसह लॉन्च झाला आहे.

Realme P3x5G स्मार्टफोनचे स्टोरेज :
Realme P3x 5G या स्मार्टफोनचा बेस वेरीएंट 6GB RAM आणि 128GB स्टोरेजसह उपलब्ध होतो. या व्हेरिएंटची किंमत 13 हजार 999 रुपये आहे. 8GB RAM आणि 128 GB स्टोरेज असलेला स्मार्टफोन 14,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. आजच स्मार्टफोन लॉन्च झाला असून याच महिन्यात म्हणजेच 28 फेब्रुवारी रोजी तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. स्मार्टफोनच्या कलर्सबद्दल सांगायचे झाल्यास स्टेलर पिंक कलर, लूनर सिल्व्हर आणि मिडनाइट ब्ल्यू अशा तीन सुंदर कलर्ससोबत स्मार्टफोन लॉन्च झाला आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशनविषयी माहिती पहा :
कंपनीने लॉन्च केलेल्या Realme P3x 5G या स्मार्टफोनमध्ये 6.72 इंच लांबीची FHD+ 120Hz LCD स्क्रीन देण्यात आली आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन प्रीमियम व्हेगन लेदर डिझाइनसह लॉन्च करण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये मल्टीटास्किंगसाठी MediaTek Dimensity 6400 SoC बसवण्यात आली आहे. ज्यामध्ये 8GB RAM आणि 10GB व्हर्च्युअल रॅम मिळणार आहे.

धूळ आणि पाण्यापासून देखील होणार संरक्षण :
स्मार्टफोनच्या जबरदस्त फीचर्समध्ये धूळ आणि पाण्यापासून संरक्षण होण्यासाठी IP68 + IP69 रेटिंग उपलब्ध करून दिले आहे. त्याचबरोबर मिलिटरी-ग्रेड शॉक रेझिस्टन्स असून हा फोन अँड्रॉइड 15-आधारित वन UI 6.0 वर कार्य करतो असं समजलं आहे.

फोटोग्राफीसाठी देखील बहुचर्चित :
रियलमी कंपनीचा Realme P3x 5G हा बहुचर्चित असलेला स्मार्टफोन अखेर लॉन्च झाला असून त्याची फोटोग्राफी क्वालिटी अत्यंत तगडी आहे. यामध्ये 50MP चा मुख्य रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. LED फ्लॅशसह सेकंडरी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. एवढंच नाही तर, स्मार्टफोनमध्ये 8MP चा सेल्फीसाठी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल सांगायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला 6000mAh बॅटरी मिळेल आणि या बॅटरीचा चार्जर 45W SuperVOOC फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह उपलब्ध होईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Realme P3x 5G(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x