10 March 2025 8:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | 67 रुपये टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर आयआरबी इन्फ्रा शेअर्स साठी BUY रेटिंग - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर घसरतोय, पण तज्ज्ञांना विश्वास, काय आहे पुढची टार्गेट प्राईस पहा - NSE: RPOWER GTL Infra Share Price | 52 आठवड्यांच्या जवळ आली पेनी स्टॉक प्राईस, ही आकडेवारी अपडेट नोट करा - NSE: GTLINFRA NTPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, होईल मजबूत कमाई - NSE: NTPC Reliance Share Price | मॅक्वेरी ब्रोकरेजने दिला खरेदीचा सल्ला, स्वस्तात खरेदीची संधी, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RELIANCE Horoscope Today | 11 मार्च 2025, कसा असेल तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस, तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 11 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

CIBIL Score | खराब सिबल सुधारण्यासाठी किती वेळ लागतो ; सिबल स्कोअर वाढण्यासाठी 'या' गोष्टी करा, भविष्यात फायदा होईल

CIBIL Score

CIBIL Score | तुमच्यापैकी कोणी बँकेत जाऊन कर्ज घेण्याचा विचार करत असेल तर, आजची बातमी तुमच्यासाठी अत्यंत खास ठरणार आहे. आज आपण कर्जासाठी लागणारा महत्त्वाचा सिबिल स्कोरविषयी माहिती जाणून घेणार आहोत. बँकिंग क्षेत्रात सिबिल स्कोरला मोलाचे स्थान असते. जो व्यक्ती कर्ज घेतो त्याचे सर्वप्रथम सिबिल स्कोर तपासले जाते. सिबेली स्कोर चांगला असेल तरच ग्राहकाला कर्ज प्राप्त होते. व्यक्ती आर्थिकदृष्ट्या कसा आहे हे दाखवून देण्याचे साधन म्हणजेच सिबिल स्कोर.

सिबिल स्कोर खराब झाल्यानंतर तुम्हाला बँकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज नामंजूर करण्यात येते. काहीवेळा कर्ज मंजूर जरी केले तरी ग्राहकांकडून जास्तीचे व्याजदर वसुलेले जाते. अशा परिस्थितीमध्ये ग्राहकाचे एकीकडून नुकसानच होत असते. चला तर आज आपण जाणून घेऊया की, सिबिल स्कोर नेमका किती असावा त्याचबरोबर स्कोर सुधारण्यासाठी नेमका किती वेळ लागतो.

सिबिल स्कोर किती असावा :
देशातील मोठमोठ्या बँका तसेच वित्तीय संस्था 300 ते 900 च्या आकड्यांमधून 750 पर्यंत ज्या व्यक्तीचा सिबिल स्कोर असेल त्याला कमीत कमी व्याजदराचे कर्ज प्राप्त करण्यात येते. मात्र ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर 300 ते 500 दरम्यान पाहायला मिळतो त्यांना कर्ज थेट नामंजूर करण्यात येते. कमी सिबिल स्कोर असलेल्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या आपले नियोजन सांभाळू शकत नाही आहेत असे गृहीत धरले जाते.

सिबिल स्कोर खराब होण्याची कारणे काय :
1. ज्या व्यक्तीने बँकेकडून कधीही लोन घेतले नसेल त्याचा सिबिल स्कोर मेन्शनच नसतो. त्यामुळे अशा व्यक्तीचा सिबिल स्कोर खराब मानला जातो.

2. बहुतांश व्यक्ती ईएमआयवर कर्ज घेतात. कर्ज घेतल्यानंतर ते वेळेवर न फेडल्यास ग्राहकांच्या सिबिल स्कोरवर परिणाम होतो.

3. बरेच व्यक्ती क्रेडिट कार्ड खरेदी करतात. जो व्यक्ती क्रेडिट कार्डच्या लिमिटपेक्षा जास्त खर्च करत असेल त्याचा देखील सिबिल स्कोर खराब होत जातो. त्यामुळे क्रेडिट कार्डची लिमिट जेवढी असते त्याच्या 30% टक्क्यांपर्यंत रक्कम खर्च करावी.

4. काही व्यक्ती असे देखील असतात ज्यांना वारंवार कर्ज घेण्याची सवय लागलेली असते. परंतु असं केल्याने वाईट परिणाम सिबिल स्कोरवर पाहायला मिळतो. त्यामुळे वारंवार कर्ज घेऊन आपल्या गरजा भागवणाऱ्या व्यक्तींना बँका कर्ज देखील देत नाहीत.

सिबिल स्कोर सुधारण्यासाठी काय करावे :
बँकेमधून कर्ज घेतले असेल तर त्याचे हप्ते वेळेवर भरण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर क्रेडिट कार्डाचे पेमेंट देखील वेळेवर करून तुमचा सिबिल स्कोर सुधरवा. त्याचबरोबर तुम्ही क्रेडिट कार्ड खरेदी केले असून त्याची लिमिट 1 लाखांची असेल तर, 30,000 रुपयांची रक्कम खर्च करा.

एवढेच नाही तर तुम्हाला तुमचा सेविंग स्कोर व्यवस्थित आहे की नाही हे प्रत्येक वर्षाला तपासून पाहिले पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित नियम फॉलो केले तर सिबिल स्कोर सुधारण्यास एक वर्ष लागेल. तुम्ही दुर्लक्ष केले तर एका वर्षापेक्षा अधिक काळ लागू शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CIBIL Score(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x