22 February 2025 7:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch
x

Mutual Fund SIP | पगारदारांनो, 3, 4 आणि 5 हजारांची मासिक SIP सुरू करून 2.5 कोटींचा परतावा मिळवा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | नोकरी करणाऱ्या व्यक्तीला भविष्यासाठी मोठा फंड तयार करून ठेवण्यासाठी सुरक्षित आणि दीर्घकाळात मजबूत परतावा मिळवून देणारी योजना हवी असते. नोकरीला असणाऱ्या व्यक्तीचे आर्थिक नियोजन अगदी शिस्तबद्ध असते. अशावेळी पैशांची बचत करण्यासाठी लोक सहसा बँकांमध्ये एफडी योजनेत पैसे गुंतवण्याचा विचार करतात. तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपी माध्यमातून पैसे गुंतवण्याचा विचार केला तर तुम्हाला वार्षिक आधारावर सरासरी 12% किंवा त्याहून अधिक परतावा मिळण्याची शक्यता असते.

आज या बातमीपत्रातून आपण म्युच्युअल फंडाच्या इन्व्हेस्टमेंटबद्दल जाणून घेणार आहोत. यामध्ये 3000, 4000 आणि 5000 रुपयांची मासिक एसआयपी केल्यानंतर अडीच कोटी रुपयांचा फंड तयार होण्यासाठी एकूण किती वर्षांचा काळ लागेल याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

3000 रुपयांचे मासिक कॅल्क्युलेशन :
समजा एखाद्या गुंतवणूकदाराने 3000 रुपयांची मासिक SIP सुरू केली आणि गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक व्याजदर 12% उपलब्ध असेल तर, अडीच कोटी रुपयांचा फंड तयार होण्यासाठी एकूण 37 वर्षांचा काय लागेल. म्हणजेचं तुम्ही 37 वर्षे गुंतवणूक केली तर, तुमच्या खात्यामध्ये 12% दरानुसार अडीच कोटी रुपयांचा फंड तयार होईल.

37 वर्षांत गुंतवणूक दराने गुंतवलेली एकूण रक्कम ही 13 लाख 32 हजार रुपयांची असेल तर, व्याजदराने मिळालेला नफा 2 कोटी 34 लाख 91 हजार 534 रुपये असेल.

4000 रुपयांचे कॅल्क्युलेशन पहा :
समजा गुंतवणूकदाराने थोडी जास्त म्हणजेच 4000 रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली तर, अडीच कोटींचा फंड तयार होण्यासाठी एकूण 35 वर्षांचा काळ लागेल. 4000 रुपयांची मासिक गुंतवणूक करून 35 वर्षांनंतर 2 कोटी 59 लाख 81 हजार 76 रुपये मिळतील. यामध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवलेली रक्कम 16 लाख 80 हजार रुपयांची असणार आहे.

5000 रुपयांचे कॅल्क्युलेशन :
5000 रुपयांची मासिक एसआयपी करून वार्षिक दराने 12% परतावा मिळवून अडीच कोटी रुपयांचा फंड तयार करण्यासाठी 33 वर्षांचा काळ लागेल. 5000 रुपयांची एसआयपी तुम्हाला 2 कोटी 54 लाख 69 हजार 990 रुपये मिळतील. यामध्ये गुंतवणूकदाराने गुंतवलेले पैसे 19 लाख 80 हजार रुपये असणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(267)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x