27 April 2025 3:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | पेनी स्टॉकने लोअर सर्किट हिट केला, हा स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Motherson Sumi Share Price | 55 रुपयांच्या शेअरबाबत महत्वाची अपडेट; शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MSUMI SJVN Share Price | पीएसयू शेअरने दिला 353 टक्के परतावा, आता फायद्याची अपडेट आली, टार्गेट जाणून घ्या - NSE: SJVN Mazagon Dock Share Price | बिनधास्त खरेदी करावा हा मल्टिबॅगर शेअर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MAZDOCK Reliance Share Price | भरवशाचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RELIANCE Vikas Lifecare Share Price | 2 रुपये 55 पैशाचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL
x

EPFO Pension Money | खाजगी कंपनी नोकरदारांना महिना रु.9642 EPF पेन्शन मिळणार, रु.15000 सॅलरी असणाऱ्यांना ही फायदा

EPFO Pension Money

EPFO Pension Money | जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य असाल तर तुम्हाला दरमहा 10,000 रुपये पेन्शन मिळू शकते. जर तुमचा मासिक मूळ पगार सध्या 15,000 रुपये असेल तर तुम्ही निवृत्तीच्या वेळेस 10,000 रुपये पेन्शन मिळण्यास कसे पात्र व्हाल याचा संपूर्ण हिशेब आम्ही आज तुम्हाला देत आहोत.

हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की ईपीएफओ अंतर्गत पेन्शनसाठी पात्र होण्यासाठी, एखाद्या व्यक्तीने ईपीएस सदस्य म्हणून कमीतकमी 10 वर्षांचे योगदान पूर्ण करणे आवश्यक आहे. ईपीएस अंतर्गत पेन्शन वयाच्या 58 व्या वर्षी सुरू होते.

खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांना महिना 9642 रुपये पेन्शन कशी मिळू शकते
वाढती महागाई लक्षात घेता सरकार ईपीएफओअंतर्गत मूळ वेतनमर्यादा 15,000 हजारांवरून 21,000 रुपयांपर्यंत वाढवू शकते, असे संकेत केंद्रीय कामगारमंत्री मनसुख एल. मांडविया यांनी नुकतेच दिले. ही वाढ 2025 पासून होण्याची शक्यता आहे. एका कर्मचाऱ्याला 10,000 हजार रुपये पेन्शन कशी मिळू शकते हे उदाहरणासह समजून घेऊया.

बेसिक सॅलरीनुसार महिना पेन्शन
उदाहरणार्थ, एखादा कार्मचारी जानेवारी 2015 मध्ये एका कंपनीत रुजू झाला. त्यावेळी त्यांची बेसिक सॅलरी 15,000 रुपये होती. आता जानेवारी 2025 मध्ये बेसिक सॅलरी मर्यादेत सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बेसिक सॅलरी मर्यादा वाढून 21,000 हजार होईल. कर्मचाऱ्याने 35 वर्षे काम केल्यानंतर 2049 मध्ये तो निवृत्त होणार आहे. आता कर्मचाऱ्याला 10,000 रुपये पेन्शन कशी मिळेल हे ईपीएफ फॉर्म्युल्याद्वारे समजून घेऊया.

ईपीएस पेन्शन कशी मोजली जाते

ईपीएस = सरासरी पेन्शनयोग्य सॅलरी x पेन्शनेबल सेवा कालावधी / 70

कर्मचाऱ्याची पहिली नोकरी भाग-1
जानेवारी 2015 ते डिसेंबर 2024 (10 वर्षे), मूळ वेतनमर्यादा : 15,000

कर्मचाऱ्याची दुसरी नोकरी भाग-2
जानेवारी 2025 ते डिसेंबर 2049 (25 वर्षे), मूळ वेतनमर्यादा : 21,000 रुपये

भाग-1 : (10 वर्षांनंतर किती पेन्शन मिळेल)
* सरासरी पेन्शनयोग्य वेतन : 15,000 रुपये
* पेन्शनपात्र सेवा : 10 वर्षे
* पेन्शन = 15,000 रुपये × 10/70 = 2,142.86 रुपये प्रतिमहिना

भाग-2 : (25 वर्षांनंतर किती पेन्शन मिळेल)
* सरासरी पेन्शनयोग्य वेतन : 21,000 रुपये
* पेन्शनपात्र सेवा : 25 वर्षे
* पेन्शन = 21,000 रुपये × 25/70 = 7,500 रुपये प्रतिमहिना

35 वर्षांच्या सेवेनंतर एकूण पेन्शन
35 वर्षांच्या सेवेनंतर एकूण पेन्शन = 2,142.86 रुपये + 7,500 रुपये = 9,642.86 रुपये प्रतिमहिना. त्यामुळे मोहन यांना निवृत्तीनंतर दरमहा सुमारे 10,000 रुपये पेन्शन मिळणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPFO Pension Money(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या