10 March 2025 2:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | कंपनीने सांगितले सिबिल स्कोअर कसा काउंट केला जातो, समजून घ्या, कर्ज मिळणे सोपे होईल SBI Mutual Fund | होय! पैसे छापायची मशीन आहे ही SBI फंडाची स्कीम, 1 लाखांवर मिळतोय 6.75 कोटी रुपये परतावा Horoscope Today | 10 मार्च 2025, कसा असेल तुमच्यासाठी सोमवारचा दिवस, तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 10 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Post Office FD | पोस्ट ऑफिस एफडीमधून लाखोंचा नफा, मॅच्युरिटीला तुम्हाला 3,62,487 रुपये मिळतील Smart Investment | पैसे बँकेत ठेऊन वाढणार नाहीत, कमी पगार असणारे 250 रुपयांची गुंतवणूक करून पैसा वाढवू शकतात Bank Loan Alert | तुमच्यावर कोणत्या प्रकारचं कर्ज आहे? कर्जदाराचा मृत्यू झाल्यास वसुली कशी लक्षात ठेवा, संकटात अडकाल
x

8th Pay Commission | बेसिक सॅलरीमध्ये 40,000 रुपये पेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता, संपूर्ण आकडेवारी समोर आली

8th Pay Commission

8th Pay Commission | आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात लक्षणीय वाढ दिसून येऊ शकते. हे फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यामुळे होईल. मात्र, वेतन आयोगाची स्थापना आणि अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग जाहीर केला आहे
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जानेवारीमध्ये घोषणा केली होती की, केंद्र सरकारने बहुप्रतीक्षित आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. मात्र, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 च्या कागदपत्रांमध्ये आठव्या वेतन आयोगासाठी सरकारला कराव्या लागणाऱ्या खर्चाचा उल्लेख नाही.

जाणून घ्या काय आहे फिटमेंट फॅक्टर
फिटमेंट फॅक्टर हा केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या सुधारित मूळ वेतनाची गणना करण्यासाठी वापरला जाणारा गुणक आहे. सातव्या वेतन आयोगाने सर्व कर्मचाऱ्यांना समानपणे लागू करण्यासाठी 2.57 चा फिटमेंट फॅक्टर प्रस्तावित केला होता. 6 व्या सीपीसीमध्ये, फिटमेंट फॅक्टर अंदाजे 1.86 होता.

जाणून घ्या फिटमेंट फॅक्टर किती वाढू शकतो
तज्ज्ञांच्या मते आठवा वेतन आयोग 2.27 ते 2.86 दरम्यान फिटमेंट फॅक्टरची शिफारस करू शकतो. तसे झाल्यास मूळ वेतनात 40 ते 50 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

बेसिक सॅलरीमध्ये 40,000 रुपये पेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता
टीमलीज डिजिटलच्या सीईओ नीती शर्मा यांनी सांगितले की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, पेन्शनमध्येही त्याच प्रमाणात वाढ होऊ शकते. बेसिक सॅलरीमध्ये 40,000 रुपये पेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता आहे, तसेच भत्ते, लाभ आणि परफॉर्मन्स पेमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.

पगार 46,600 ते 57,200 रुपयांपर्यंत वाढू शकतो
तज्ज्ञांनी सांगितले की, आठव्या वेतन आयोगापासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत. फिटमेंट फॅक्टर 2.28 ते 2.86 दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 40 ते 50 टक्के वाढ होऊ शकते. उदाहरणार्थ, ज्या कर्मचाऱ्याचे सध्या मूळ वेतन 20,000 रुपये आहे, त्याचा पगार 46,600 ते 57,200 रुपयांपर्यंत वाढू शकतो.

आयोगाने 2.86 फिटमेंट फॅक्टरची शिफारस केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 वरून 51,480 रुपये होईल, हे साधे सूत्र – 2.86 * सध्याचे मूळ वेतन. अशा परिस्थितीत किमान पेन्शन 9,000 रुपयांवरून 36,000 रुपये होईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#8th Pay Commission(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x