9 March 2025 8:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | कंपनीने सांगितले सिबिल स्कोअर कसा काउंट केला जातो, समजून घ्या, कर्ज मिळणे सोपे होईल SBI Mutual Fund | होय! पैसे छापायची मशीन आहे ही SBI फंडाची स्कीम, 1 लाखांवर मिळतोय 6.75 कोटी रुपये परतावा Horoscope Today | 10 मार्च 2025, कसा असेल तुमच्यासाठी सोमवारचा दिवस, तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 10 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Post Office FD | पोस्ट ऑफिस एफडीमधून लाखोंचा नफा, मॅच्युरिटीला तुम्हाला 3,62,487 रुपये मिळतील Smart Investment | पैसे बँकेत ठेऊन वाढणार नाहीत, कमी पगार असणारे 250 रुपयांची गुंतवणूक करून पैसा वाढवू शकतात Bank Loan Alert | तुमच्यावर कोणत्या प्रकारचं कर्ज आहे? कर्जदाराचा मृत्यू झाल्यास वसुली कशी लक्षात ठेवा, संकटात अडकाल
x

EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, EPF चे पैसे ATM मधून झटपट काढू शकता, अपडेट जाणून घ्या

EPFO Money Alert

EPFO Money Alert | केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) लवकरच “ईपीएफओ 3.0 आवृत्ती” सुरू करणार आहे, ज्यामुळे ईपीएफओ सदस्यांना एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा मिळेल.

याव्यतिरिक्त, त्यांना इतर अनेक नवीन वैशिष्ट्ये मिळतील. ईपीएफओच्या तेलंगणा विभागीय आणि प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर केंद्रीय कामगार मंत्री मांडविया म्हणाले की, “ईपीएफओ 3.0 आवृत्ती” बँकिंग प्रणालीच्या समकक्ष असेल.

‘ईपीएफओ’चे सदस्य हवे तेव्हा एटीएममधून पैसे काढू शकतात
येत्या काही दिवसांत ईपीएफओचे व्हर्जन 3.0 येत आहे. म्हणजेच ईपीएफओ बँकेसारखा होईल. बँकेच्या व्यवहाराप्रमाणेच तुमच्याकडे युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) असेल आणि तुम्ही तुमची सर्व कामे करू शकाल. हे तुमचे पैसे आहेत, तुम्ही हवे तेव्हा ते काढू शकता.

ईपीएफओ कार्यालयात जाण्याची गरज नाही
केंद्रीय मंत्री म्हणाले, ‘तुम्हाला अजूनही ईपीएफओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. मी तुम्हाला वचन देतो की, येत्या काही दिवसांत तुम्हाला हवं तेव्हा एटीएममधून पैसे काढता येतील. आम्ही ईपीएफओमध्ये अशा सुधारणा करत आहोत. ईपीएफओ प्लॅटफॉर्ममध्ये झपाट्याने बदल होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी निधी हस्तांतरण, क्लेम ट्रान्सफर आणि ईपीएफओ डेटाबेसमध्ये नोंदणीकृत सदस्यांच्या नावांमध्ये सुधारणा, तसेच कोणत्याही बँकेतून पेन्शन काढण्याची सुविधा यासह लाभार्थ्यांसाठी केलेल्या उपाययोजनांचा ही उल्लेख केला.

ईपीएफओ 3.0 म्हणजे काय?
यावर्षी मे-जूनपर्यंत ईपीएफओ 3.0 अँप लाँच करण्याची सरकारची योजना आहे. या अँपच्या आगमनामुळे ईपीएफओ च्या सदस्यांना त्यांचे पीएफ स्टेटस तपासणे, निधी हस्तांतरित करणे किंवा दाव्यांचा निपटारा करणे सोपे होणार आहे. सध्या पीएफचे पैसे काढण्यासाठी बराच वेळ लागतोच, शिवाय ईपीएफओ सदस्यांना त्यांच्या निधीपर्यंत पोहोचण्यासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPFO Money Alert(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x