22 November 2024 1:32 AM
अँप डाउनलोड

MPSC लिपिक भरती पेपर २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
संदीपच्या पुढे दोन मुले सोडून त्याच रांगेत ७ मुली आहेत. आणि संदीपच्या पाठीमागे ७ मुले सोडून त्याच रांगेत १० मुली उभ्या आहेत तर मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे?
प्रश्न
2
राज्य शासनाचा पहिला पं. भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला?
प्रश्न
3
तो गाणे गातो. (प्रयोग ओळखा)
प्रश्न
4
चार क्रमवार सम संख्यांची सरासरी २७ आहे तर त्यांच्यापेक्षा सर्वात लहान संख्या कोणती?
प्रश्न
5
ज्या क्रियापडला दोन कर्मे लागतात अशा क्रियापदाला काय म्हणतात?
प्रश्न
6
संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या?
प्रश्न
7
All that glitters is not gold. ह्या इंग्रजी म्हणीच्या समानार्थी म्हणीचा पर्याय पुढील पर्यायातून निवडा.
प्रश्न
8
लेखननियमांनुसार शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
9
एका गाडीचा वेग जर ताशी ८ कि.मी. वाढवला तर ती ४४० कि.मी. चा प्रवास करण्यासाठी ३० मिनिटे कमी घेते तिचा सध्याचा वेग किती?
प्रश्न
10
१९८० मध्ये दुसऱ्या मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
11
७ तास + १५ मिनिटे + २० सेकंद = किती सेकंद ?
प्रश्न
12
खसखस पिकणे या वाक्प्रयोगाचा अर्थ लिहा.
प्रश्न
13
कवीश्वर या शब्दातील संधीचा प्रकार कोणता?
प्रश्न
14
१५ व्या लोकसभा निवडणुकीनुसार भारतात अनुसूचित जातीसाठी किती मतदार संघ राखीव आहेत?
प्रश्न
15
पुढीलपैकी स्वरादीवर्ण ओळखा.
प्रश्न
16
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा शब्द कोणता?वैशाख : चैत्र :: ? : जानेवारी
प्रश्न
17
Fallow and means land which is ____
प्रश्न
18
जागृती या शब्दाच्या अर्थाचा योग्य पर्याय ओळखा.
प्रश्न
19
Choose the incorrect sentence.
प्रश्न
20
I can’t read his writing. It is _______
प्रश्न
21
मी निबंध लिहितो या वाक्याचा रिती भूतकाळ लिहा.
प्रश्न
22
जर ३ + ४ – ६४२७, ६ + २ = ८२१६ तर ५ + १ = ?
प्रश्न
23
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
प्रश्न
24
Which one of the following sentence is correct?(i) he is pleased on me.(ii) he is pleased with me.
प्रश्न
25
उपसर्गघटीत, प्रत्ययघटीत व सामासिक हे कोणत्या शब्दांचे प्रकार आहेत?
प्रश्न
26
खालीलपैकी विजोड पद ओळखा.५८, ९७, ६७, ९४
प्रश्न
27
वाक्यातील विराम बदलला की वाक्याचा अर्थ बदलतो यास काय म्हणतात?
प्रश्न
28
१ पासून १०० पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
प्रश्न
29
दिलेल्या संख्या मालेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?२, ४, ५, १०, १२, २४, २७, ___?
प्रश्न
30
सहज सख्या एकदाच येई सांजवेळी या काव्यातील एस ओळखा.
प्रश्न
31
पुढीलगटातील गटातील परसवर्ण शब्दांचा गट ओळखा.
प्रश्न
32
अनल-वन्ही, आश्चर्य-विस्मय, कावळा-वायस तर अश्व या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता?
प्रश्न
33
जर ८२ / २३ = २, ४५ / २७ = १, ६९ / ३२ = ३ तर ९७ / २६ = किती?
प्रश्न
34
एल. सी. ए. तेजस भारतीय सैन्यदलासाठी काय आहे?
प्रश्न
35
जर शिक्षक दिन शुक्रवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल?
प्रश्न
36
फेमिना मिस इंडिया २०१३ ची विजेती कोण आहे?
प्रश्न
37
दिलेल्या शृंखलेत क्रमाने येणारी पुढील संख्या कोणती?१, ५, २१, ५७, १२१, __?
प्रश्न
38
Which of the following is an abstract noun?
प्रश्न
39
संयुक्त वसाहती मध्ये सर्वात लहान खेड्याच्या नावापुढे लावले जाणारे विशेषण?
प्रश्न
40
काकदृष्टिने पाहणे या म्हणीचा अर्थ लिहा.
प्रश्न
41
Compete the following sentence with the correct alternative.Roll out the ______
प्रश्न
42
गंगा या शब्दाचे षष्ठी विभक्तीचे रूप काय होईल?
प्रश्न
43
The tree primary auxiliaries are
प्रश्न
44
The earth moved round the sun. Point out the part of this sentence that is incorrect?
प्रश्न
45
ख्रिश्चनांचे सर्वोच्च १६ वे धर्मगुरू ……. यांनी २०१३ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला.
प्रश्न
46
कंटकाचा परित्याग करणे या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी अर्थ कोणता?
प्रश्न
47
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभिषेकप्रसंगी काढलेली तांब्याची नाणी कोणती?
प्रश्न
48
Fill in the blank with the correct verb.I usually walk to college, but today ______ in my uncle’s car.
प्रश्न
49
हालअपेष्टा सहन करण्याचा गुण शब्दसमूहाबद्दल समूहदर्शक शब्द कोणता?
प्रश्न
50
प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.PQRS : WVUT :: MNOP : ?
प्रश्न
51
४० पेक्षा मोठ्या व ६० पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती?
प्रश्न
52
रेशमाचे वय तिच्या भावच्या वयाच्या १/२ आणि आईच्या वयाच्या १/६ पट आहे. भावाच्या व आईच्या वयातील फरक २४ वर्षे असल्यास रेशमा व तिचा भाऊ यांच्या वयांची बेरीज किती?
प्रश्न
53
A व B या दोघांनी शाळेपासून चालण्यास एकाच वेळी सुरुवात केली. A हा ४ कि.मी. उत्तरेकडे चालत गेला नंतर उजव्या बाजूला वळून ५ कि.मी. चालला. तर B हा पश्चिमेकडे ६ कि.मी. चालत गेला नंतर उजव्या बाजूला वळून पुन्हा ४ कि.मी. चालला तर A हा B पासून किती अंतरावर आहे?
प्रश्न
54
खालीलपैकी केवलप्रयोगी अव्यय कोणते?
प्रश्न
55
एका रांगेत २५ आंब्यांच झाडे आहेत. प्रत्येक दोन झाडांमध्ये २ मित्र अनर आहे. तर पहिल्या व शेवटच्या झाडांमध्ये किती अंतर आहे?
प्रश्न
56
खालीलपैकी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिन कोणत्या दिवशी पाळला जातो?
प्रश्न
57
खालीलपैकी मुलभूत अधिकार कोणते?अ) माहितीचा अधिकारब) पिळवणुकीविरुद्धचा अधिकारक) धर्मस्वातंत्र्याचा अधिकारड) मानव अधिकार
प्रश्न
58
What is opposite of the word ‘entrance’?
प्रश्न
59
२०१२ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड झालेले डॉ. रावूरी भारद्वाज हे कोणत्या भाषेतून साहित्यसेवा करतात?
प्रश्न
60
तू मला पुस्तक दिलेस हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे?
प्रश्न
61
मुळाक्षरे यासाठी पर्यायी शब्द कोणता आहे?
प्रश्न
62
जर घड्याळ १२ तासाऐवजी ८ ताशी केले तर ३ च्या विरुद्ध (समोर) कोणता अंक येईल?
प्रश्न
63
पिसू या ऊ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन कसे होते?
प्रश्न
64
विभक्तीच्या अर्थाने शब्दयोगी अव्यये नामास लागतात व ती लागण्यापूर्वी त्यांचे बहुधा सामान्यनाम होते त्या रुपास काय म्हणतात?
प्रश्न
65
A horse ……….
प्रश्न
66
रामकृष्ण हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
प्रश्न
67
मंगळ ग्रहासंदर्भात संशोधन करण्यासाठी कोणते अवकाशयान सध्या कार्यरत आहे?
प्रश्न
68
भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले?
प्रश्न
69
एका सांकेतिक भाषेत गमन = ४२६, मरण = २३५, गजर = ४१३, नर्म = ६३२ तर नजर हा शब्द कसा लिहावा लागेल?
प्रश्न
70
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल?तपटा : थपटा :: चटका : ?
प्रश्न
71
चंद्रोदय या जोडशब्दात एकत्र येणारे स्वर व संधी बनलेला वर्ण ओळखा.
प्रश्न
72
Which one of the following sentences is correct ?(i) your lovely friend(ii) your loving friend
प्रश्न
73
अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणाऱ्यास _____ म्हणतात.
प्रश्न
74
पुढीलपैकी अपूर्णवर्तमानकाळाचे उदाहरण कोणते?
प्रश्न
75
सन १९३६ साली दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला?
प्रश्न
76
नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी संबध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना संबंध ………. असे म्हणतात.
प्रश्न
77
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
78
पुढीलपैकी कोणता सामासिक शब्द समाहार द्वंद्व समासात आढळत नाही?
प्रश्न
79
व्याकरण म्हणजे काय?
प्रश्न
80
शाकुंतल या संस्कृत नाटकाचा मराठीत अनुवाद पुढीलपैकी कोणी केला आहे?
प्रश्न
81
उद्देश व विधेय हे कशाचे घटक आहेत?
प्रश्न
82
क्षय हा रोग कशामुळे होतो?
प्रश्न
83
Choose the correct sentence.
प्रश्न
84
संस्कृत भाषेतील शब्द जसेच्या तसे मराठी भाषेत आले आहेत त्या शब्दांना काय म्हणतात?
प्रश्न
85
दवाखाना, दिवाणखाना हे शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेच्या प्रभावातून आलेले आहेत?
प्रश्न
86
Change the following affirmative sentence into negative.Shut the door.
प्रश्न
87
योग्य जोड्या लावा.Question title
प्रश्न
88
Identify the adjective in the sentence.The hand has five fingers.
प्रश्न
89
उपपद किंवा कृदन्त तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते?
प्रश्न
90
एका मैदानावर कवायतीसाठी एका रांगेत जितकी मुले उभी होती तितक्याच रांगा होत्या. मध्यभागी असणाऱ्या रांगेत राजू मध्यभागी उभा असल्यास त्या क्रीडांगणावर कवायतीसाठी उभ्या असलेल्या मुलांची संख्या दिलेल्या पर्यायामधून निवडा.
प्रश्न
91
पुढील शब्दातील उपसर्गघटीत शब्द निवडा.
प्रश्न
92
आई त्या मुलाला हसविते हे उदाहरण क्रियापदाच्या कोणत्या प्रकारात मोडते?
प्रश्न
93
४२.५ मीटर लांबीच्या सळईपासून, तेवढ्याच व्यासाच्या ८५ से.मी. लांबीच्या किती सळ्या बनवता येतील?
प्रश्न
94
खानदेश भागात बोलली जाणारी बोली कोणती?
प्रश्न
95
Pick out the correct alternative to complete the following sentence.If she worked regularly, she …… her goal.
प्रश्न
96
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त सिंचन तीव्रता आहे?
प्रश्न
97
बाबासाहेब ठाकरे मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या कोणत्या मराठी व्यंगचित्र साप्ताहिकाचे संपादक होते?
प्रश्न
98
If you run fast now, you will get that bus.This sentence suggests ______
प्रश्न
99
प्रत्यक्षात असणाऱ्या वा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना जी नावे असतात त्यांना व्याकरणात काय म्हणतात?
प्रश्न
100
जर एक डझन केळींची किंमत १ रु. ने वाढविली तर ४० रुपयांना मिळणारी केळी दोन डझन ने कमी होतील. १ डझन केळ्यांची मूळ किंमत काढा?

राहुन गेलेल्या बातम्या

x