26 December 2024 6:39 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-96

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
केंद्रीय आर्थिक पाहणीनुसार २०१४-१५ सालासाठी निर्यातीमधील प्रमुख वस्तूंच्या हिश्श्यानुसार त्यांचा सुरुवातीकडून शेवट असा योग्य क्रम ओळखा.
प्रश्न
2
अ) नोव्हेंबर २०१६ मध्ये भारतातील सर्वाधिक लांबीचा द्रूतगतीमार्ग (एक्सप्रेसचे) उत्तर प्रदेशात सुरु केला गेला. ब) हा द्रूतगती मार्ग एकूण ३०२ कि.मी. लांबीचा आहे.
प्रश्न
3
भारतीय रिजर्व्ह बँकेने ‘शारिया -बँक’ व्यवस्था भारतात सुरु करण्यासंबंधीच्या प्रस्ताव केंद्रीय वित्त मंत्रालयास सादर केला आहे. या संबंधीचे योग्य विधान ओळखा. अ) या बँक व्यवस्थेमध्ये कर्जरूपाने पैसे दिले जात नाहीत ब) या बँक व्यवस्थेमध्ये सोने स्वरुपात तारण ठेवण्याची व्यवस्था नाही. क) या बँक व्यवस्थेमध्ये कर्ज देणे आणि कर्ज घेणे यावर बंदी असते. ड) या बँक व्यवस्थेमध्ये कर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारण्यास मनाई असते.
प्रश्न
4
योग्य पर्याय निवडा. अ) २०१६ चा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) गोवा येथे २१ नोव्हेबर रोजी सुरु झाला . ब) हा ४७ वा ‘भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ आहे. क) या चित्रपट महोत्सवाचे उदघाटन रमेश सिप्पी यांच्या हस्ते झाले.
प्रश्न
5
‘पहचान’ (Penchan) ही ओळखपत्र आधारित योजना खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाकडून राबविली जात आहे.
प्रश्न
6
योग्य पर्याय निवडा . अ) ‘इफफी’हा चित्रपट महोत्सव दरवर्षी गोवा येथे आयोजित केला जातो. ब) १९५२ साली या चित्रपट महोत्सवाची स्थापना झाली होती.
प्रश्न
7
योग्य पर्याय निवडा. अ) गगनजित भुल्लर या न]=भारतीय गोल्फपटुने २०१६ ची इंडोनेशिया ओपन ही स्पर्धा जिंकली आहे. ब) भुल्लर याने आतापर्यंत ही स्पर्धा दोनवेळा जिंकली आहे.
प्रश्न
8
२०१६-१६ च्या भारताच्या आर्थिक पाहणीनुसार…………… अ) २०१४-१५ सालासाठी भारताचा वस्तू निर्यात वृद्धीदर उणे १.३ टक्के राहिला होता. ब) २०१४ -१५ सालासाठी भारताच्या निर्यातीतील प्रमुख वस्तूमध्ये ‘वाहतूक उपकरणे’ गटातल्या’ वस्तूंनी सर्वाधिक वृद्धीदर नोंदविला होता.
प्रश्न
9
२०१६ च्या ‘इफफी (IFF) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी’ योग्य विधाने निवडा. अ) या चित्रपट महोत्सवावेळी ‘साउथ कोरिया’ या देशाला ‘फोकस कंट्री’ म्हणून दर्जा दिला गेला आहे. ब) या महोत्सवावेळी भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक एस.पी.बालसृब्रमण्यम यांना २०१६ चा’शताब्दी पुरस्कार’ दिला गेला .
प्रश्न
10
केंद्रीय आर्थिक पाहणीनुसार २०१४-१५ सालासाठी आयातीमधील प्रमुख वस्तूंचा त्यांच्या हिश्श्यानुसार योग्य क्रम ओळखा.
प्रश्न
11
२०१४-१५ सालासाठी मोजलेल्या भारताच्या निर्यातीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा सर्वाधिक हिस्सा आहे.
प्रश्न
12
‘जर्मनवॉच’ या हवामान बदलासंबंधीच्या अभ्यास करणाऱ्या युरोपीयन स्वायत्त संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘२०१७ हवामान बदल कामगिरी निर्देशांक’ नुसार……… अ) भारत २० व्या स्थानावर आहे. ब) हा निर्देशांक एकूण ५८ देशांसाठी मोजला गेला आहे. a
प्रश्न
13
‘आय.एन.एस.चेन्नई’ विषयी पुढील विधाने विचारात घ्या. अ) भारतीय नौदलात समाविष्ट केली गेलेली ही ‘कोलकाता वर्ग’ प्रकारातील विनाशिका आहे. ब) ‘ प्रोजेक्ट १५-A’ अंतर्गत विकसित केली गेलेली ही तिसरी आणि शेवटची विनाशिका आहे.
प्रश्न
14
फक्त २३ महिन्यात विकसित केला गेलेला उत्तर प्रदेशात असलेला एक्सप्रेसवे नोव्हेंबर २०१६ मध्ये सुरु झाला महामार्ग कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो ?
प्रश्न
15
अ)अणुसंसोधनातील युरोपियन संघटना ‘सर्न’ च्या सहयोगी सदस्यांमध्ये भारताचा नुकताच समावेश केला गेला आहे. ब) जानेवारी २०१७ पासून भारत ‘सर्न’ चा सहयोगी सदस्य म्हणून कार्य करणार आहे. क) ‘सर्न’ च्या सदस्यत्वासंबंधी करार ‘भारतीय अणुउर्जा आयोगाचे’ अध्यक्ष शेखर बसू आणि ‘सर्न’ चे महासंचालक डॉ. फबीओला गियानोट्टी यांच्यात मुंबई येथे केला गेला.
प्रश्न
16
खालील विधाने विचारात घ्या. अ) अणुभौतिक संशोधनात कार्य करणारी ‘सर्न’ या संस्थेने मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. ब) या संघटनेची स्थापना १९५४ साली झाली . क) सध्या या संस्था -संघटनेवर २२ सदस्यदेश कार्यरत आहेत.
प्रश्न
17
भारतीय नौदलासाठी विकसित केल्या गेलेल्या ‘कोलकाता वर्ग’ प्रकारातल्या खालीलपैकी कोणत्या विनाशिका जहाजांचा ‘प्रोजेक्ट १५-A’ मध्ये समावेश होतो ? अ) आय.एन.एस.दिल्ली           ब) आय.एन.एस.कोलकाता क) आय.एन.एस.कोची           ड) आय.एन.एस.चेन्नई
प्रश्न
18
भारतीय बडमिटनपटू पी.व्ही.सिंधूने नुकतीच ‘२०१६-चीन खुली महिला बडमिंटन स्पर्धा’ जिंकली. अ) ही स्पर्धा जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय बडमिंटनपटू आहे. ब) सिंधूने अंतिम सामन्यात सून-यु हिचा पराभव केला.
प्रश्न
19
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेविषयी पुढील विधाने विचारात घ्या. अ) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेला आग्रा (उत्तरप्रदेश) येथून सुरुवात झाली. ब) या योजनेंतर्गत प्रत्येक घरासाठी १.६ लाख रुपयापर्यत मदत केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे.
प्रश्न
20
‘काळा पैसा’ रोखण्यासाठी मे २०१७ पासून उच्च रकमेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासंबंधीचा …………हा उपक्रम भारतीय आयकर विभागाकडून राबविला जाणार आहे.
प्रश्न
21
२०१६ च्या ‘चीन खुली बडमिंटन सुपर सिरीज स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूने …………चा पराभव केला.
प्रश्न
22
‘उवेना फर्नांडिस’ ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळ प्रकाराशी संबंधित आहे.
प्रश्न
23
२०१६-१६ च्या भारताच्या आर्थिक पाहणीनुसार……….. अ) २०१४-१५ मध्ये भारताचा जी.डी.पी.वाढीचा दर ७.६ टक्के होता. ब) २०१६-१६ मध्ये भारताचा जी.डी.पी. वाढीचा दर ७.२ टक्के होता. क) जागतिक उत्पन्नामध्ये (Gobal GDP) भारताचा हिस्सा २००८ ते २०१३ दरम्यान सरासरी ६.१ टक्के झाला .
प्रश्न
24
डॉ. डेंटन कुली यांचे नुकतेच निधन झाले.
प्रश्न
25
२०१६ च्या ‘इंटरनशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडिया’ चित्रपट महोत्सवावेळी खालीलपैकी कोणास ‘जीवन गौरव’ पुरस्कार दिला गेला .

राहुन गेलेल्या बातम्या

x