पाककृती - (Procedure)
- वरणासाठी तुरीची डाळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा.हळद घालून कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून शिजवून घ्या.
- नंतर चवीप्रमाणे मिठ घालून पाणी घालून पातळ वरण छान उकळून घ्या.
- बट्टयांसाठी सोडा आणि दही सोडून बाकी सर्व पदार्थ एकत्र करून पिठ छान चोळून घ्यावे.पिठात आळे करून त्यात दही आणि सोडा टाकून एकत्र करा.
- पाणी घालून कणीक नरम भिजवून घ्या.अर्धा तास कणीक झाकून ठेवा.
- तेलाचा हात लावून कणीक मळून चार गोळे बनवा.
- गोल बट्टी बनवून घ्या.उकळत्या पाण्यात एक चमचा तेल घालून एकेक बट्टी पाण्यात सोडा.हाय गॅस करून झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवा.
- मधे एक दोनदा हलवून घ्या, नंतर गॅस कमी करून दहा मिनिटे शिजवा.बट्टया वर तरंगायला लागल्या की पाण्यातून काढून थंड होऊ द्या.
- तुकडे करून तेलात तळून घ्या.
- वांगी कापून पाण्यात टाका.
- आलं, लसूण, मिरची बारीक करून घ्या, तेलात मोहरी, जिरे टाकून फोडणी करा.
- कढीपत्ता टाका.
- आलं लसूण मिरची पेस्ट एक चमचा शिल्लक ठेवून बाकी पेस्ट आणि सर्व मसाले घालून परतावे.
- वांगी, मीठ, एक वाटी पाणी घालून कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून शिजवून घ्या.
- कुकर गार झाल्यावर भाजी रविने छान घोटून घ्या.
- एक चमचा आलं, लसूण, मिरची पेस्ट घालून दोन मिनिटे शिजवा.
- कोथिंबीर टाका.
- आणि गरमागरम वरण बट्टी वांग्याची भाजीचा आस्वाद घ्या.
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- वरण (Varan)
- तुरीची डाळ एक वाटी (Red gram 1 bowl)
- हळद अर्धा चमचा (Turmeric powder 1/2 tsp)
- मीठ चवीनुसार (Salt as per taste)
- बट्टी (Batti)
- रवाळ कणीक ३ वाट्या (Rough whole wheat flour 3 bowl)
- रवाळ मक्याच पिठ अर्धी वाटी (Rough corn flour 1/2 bowl)
- बडीशेप एक चमचा (Fennel seeds 1 tsp)
- ओवा एक चमचा (Carom seeds 1 tsp)
- हळद अर्धा चमचा (Turmeric powder 1/2 tsp)
- जीरे एक चमचा (Cumin seeds 1 tsp)
- मीठ चवीप्रमाणे (Salt as per taste)
- तेल दोन मोठे चमचे (Oil 2 tbs)
- दही दोन मोठे चमचे (Curd 2 tbs)
- खाण्याचा सोडा अर्धा छोटा चमचा (Baking soda 1/2 tsp)
- बट्टी तळण्यासाठी तेल (Oil for frying)
- वांग्याची भाजी (Bringal Bhaji)
- वांगी ५०० ग्राम (Brinjal 500 gram)
- हिरवी मिरची १५/१६ (Green chillies 15/16)
- आलं १” (Ginger 1″)
- लसूण २०/२५ पाकळ्या (Garlic cloves 20/25)
- तेल दोन मोठे चमचे (Oil 2 tbs)
- मोहरी एक चमचा (Mustered seeds 1 tsp)
- जिरं एक चमचा (Cumin seeds 1 tsp)
- कढीपत्त्याची पाने २०/२५ (Curry leaves 20/25)
- जिरं पूड एक चमचा (Cumin powder 1 tsp)
- हळद अर्धा चमचा (Turmeric powder 1/2 tsp)
- धणेपूड एक चमचा (Dry coriander powder 1 tsp)
- गरम मसाला अर्धा चमचा (Garam masala powder 1/2 tsp)
- मीठ चवीप्रमाणे (Salt as per taste)
- कोथिंबीर (Coriander leaves)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार