19 April 2025 7:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

विधानसभा:: राणेंना भाजपात तर भुजबळांना शिवसेनेत आणण्याची तयारी?

BJP, Shivsena, MP Narayan Rane, Chagan Bhujbal

मुंबई : राज्याच्या सक्रीय राजकारणातून बाहेर फेकले गेलेले माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे नाराज असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कॉंग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक असणारे राणे यांना शिवसेनेच्या विरोधामुळे स्वतंत्र पक्ष काढावा लागला आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आग्रही असल्याने मुख्यमंत्र्याची भेट घेतल्याचं बोलले जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू असल्याबाबत विचारणा करता, योग्य वेळी उत्तर देऊ, असे सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केले. खासदार नारायण राणे नेमका कोणता निर्णय घेतात त्यावरून शिवसेना छगन भुजबळ यांच्याबाबतीत निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. विशेष म्हणजे आमच्या प्रतिनिधींना भाजपच्याच गोटातून मिळत असलेल्या माहितीनुसार भाजप प्रत्येक मोठ्या बैठकीत शिवसेनेसोबतच्या जागावाटपावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशा बातम्या प्रसार माध्यमांकडे जाणीवपूर्वक पेरून सेनेला गाफील ठेवत आहे आणि विधानसभा स्वबळावर लढण्याची रणनीती आखात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील पक्षाच्या ताकदीची चाचपणी सुरु असून जेथे भाजपाची ताकद नाही किंवा संघटन नाही तेथे इतर शक्तिशाली आणि संघटन असलेल्यांना पक्षात प्रवेश देऊन तयारी सुरु आहे.

दोन्ही पक्षाचे नेते युतीने लढण्याचा दावा करत आहेत, परंतु स्वतंत्र लढण्याची चाचपणी देखील केली जात आहे. यामध्ये नारायण राणे यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश देत कोकणात शिवसेनेलाच शह देण्याचा प्रयत्न भाजप करताना दिसत आहे. राणेंच्या भाजप प्रवेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच प्रयत्न करत असल्याचं राणेंनी यांनीच एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं होतं. तसेच मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भातील राणे समिती आणि त्यांचं योगदान भाजपाला लाभदायी ठरू शकतं त्यामुळे भाजप सर्व योजना आखात असल्याचं म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या