23 November 2024 2:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024
x

चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला मी किंमत देत नाही: उद्धव ठाकरे

Chandrakant Patil, Uddhav Thackeray, BJP, Shivsena

मुंबई : युतीचे जागावाटप निम्म्या जागांच्या समीकरणात होणार नाही, या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर जागावाटपाचा अधिकार मी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांचाच असल्याचे ठासून सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला किंमत देत नसल्याचे सूचित केले.

बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार विलास तरे यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव यांनीही रविवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विलास तरे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. उद्धव यांनी यावेळी विलास तरे यांना शिवबंधन बांधले.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, युतीच्या जागावाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रत्येकी दोन बैठका झाल्या आहेत. दोन्ही बैठका वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या असून त्याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. विद्यमान ६३ आमदारांसह आणखी तेवढ्याच, साधारणपणे १२० ते १२५ जागा शिवसेनेच्या वाट्याला येतील. १६३ ते १६८ जागा भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांना मिळतील. तर भारतीय जनता पक्ष विद्यमान १२२ आमदारांसह मित्रपक्षांसाठी १६३ ते १६८ जागांसाठी आग्रही आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे २५ ते ३० विद्यमान आमदारांना वगळणार असून नवीन चेहऱ्यांना (इनकमिंग) संधी देणार असल्याचे समजते.

दुसऱ्या बाजूला शिवसेना कोणत्याही परिस्थितीत वेगळे लढण्याच्या मानसिकतेत नाही. तसा विचार झालाच तर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडेल अथवा शिवसेनेचे काही आमदार भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर उभे राहतील, अशी भीती शिवसेनेच्या नेत्यांना आहे. मध्यंतरी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘‘आपल्याकडे कोणत्याही ८० जागा द्या, मी त्या निवडून आणतो, नाही आणल्या तर मला मंत्रीपद देऊ नका’’ असे आव्हान जाहीरपणे स्वीकारले आहे. त्यावर ‘आमच्या दोन जागा जास्ती घ्या, पण आम्हाला तुमचे गिरीश महाजन द्या’, असे उद्धव ठाकरे यांनी उपरोधिकपणे म्हटले होते.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x