22 November 2024 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

काँग्रेसचे संकटमोचक देखील ईडीच्या कचाट्यात; डी. के. शिवकुमार यांना समन्स जारी

D K Shivkumar, ED Notice, ED Office, ED Summons, Congress

नवी दिल्ली : काँग्रेसचे ‘संकटमोचक’ अशी ओळख असलेले डी. के. शिवकुमार यांच्यावरच संकट ओढावले आहे. त्यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स जारी केले असून चौकशीसाठी बोलविले आहे. त्यामुळे डी. के. शिवकुमार आज दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, कर्नाटकातील काँग्रेस जेडीएस सरकार पाडताना डी. के. शिवकुमार यांनी भारतीय जनता पक्षातील धुरंदरांचा धूर काढला होता आणि त्यानंतर ते भविष्यात भाजपाला धोका निर्माण करू नये म्हणून आधीच त्यांचा बंदोबस्त करण्यात येत असल्याचं म्हटलं जातं आहे.

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या पाठोपाठ आता कर्नाटकातील काँग्रेस नेते डी.के.शिवकुमार यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी होणार आहे. शिवकुमार यांची कर्नाटकातील काँग्रेसचे संकटमोचक अशी ओळख आहे आणि कर्नाटकातील फुटलेल्या काँग्रेस आमदारांचा देखील त्यांनी मुंबईत येऊन घाम काढला होता. अक्षरशः डी. के. या नावाची देखील त्यांनी धास्ती घेतली होती. परंतु आता त्यांच्यावरच ईडीच्या चौकशीचे संकट ओढावले आहे. गुरूवारी कर्नाटक हाय कोर्टाने शिवकुमार यांची याचिका फेटाळली होती. या याचिकेत त्यांनी ईडीचे समन्स रद्द करण्याची मागणी कोर्टाकडे केली होती. मात्र कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली असून आता त्यांना ईडीसमोर चौकशीसाठी जावे लागणार आहे. दरम्यान, आज (शुक्रवारी) ते ईडीसमोर हजर राहण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच कथित आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीदेखील ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता शिवकुमार यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. यापूर्वी आयकर विभागाने शिवकुमार यांच्या दिल्लीतील काही ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यामध्ये ८ कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आली होती. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ईडीने डी.के.शिवकुमार आणि त्यांच्या तीन सहकाऱ्याविरोधात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली खटला दाखल करण्यात आला होता.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x