22 November 2024 10:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

मुस्लिम मतं मिळत नसल्याने MIM'ला फक्त ८ जागा; वंचित आघाडी तुटणार? सविस्तर

MIM, Vanchit bahujan Aghadi, Prakash Ambedkar, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई : लोकसभा निवडणुकीत आश्चर्यकारत मते मिळवित चर्चेत आलेल्या वंचित बहुजन आघाडीचं आगामी विधानसभा निवडणुकीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत. एमआयएम आणि भारिप बहुजन आघाडी यांना लोकसभा निवडणुकीत लाखांच्या पुढे मतदान झालं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात अपेक्षा लागून राहिल्या आहेत.

एमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन औवेसी आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतदारांना एकत्र आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. लोकसभा निवडणुकीत एमआयएमने औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत यश मिळवित राज्यात पहिले खाते उघडले. मात्र प्रकाश आंबेडकर यांना अकोला आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता.

लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएमच्या आघाडीनं भल्याभल्यांना घाम फोडला. इतकंच नाही तर औरंगाबादच्या रुपानं एक खासदारसुद्धा त्यांना मिळाला, या आघाडीनं राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीची धुळधाण उडवली, मात्र हीच आघाडी आता तुटल्यात जमा आहे, कारण एमआयएमनं वंचित बहुजन आघाडीला सुरुवातीला १०० जागांची मागणी केली होती, त्यानंतर ही मागणी ७५ वर आली त्यानंतर अगदी ५० वरही एमआयएम तयार झाली, मात्र आंबेडकरांनी या सगळ्यांच मागण्यांना केराची टोपली दाखवली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार आंबेडकरांनी एमआयएमला फक्त ८ जागा देवू केल्या आहेत, त्यापेक्षा जास्त जागा मिळणार नाही असंही त्यांनी एमआयएमला कळवलं आहे. यामुळं एमआयएम मात्र चांगलचं संतापलं आहे. ८ जागांचा प्रस्ताव त्यांनी फेटाळला आहे. आठवडा भरापूर्वी ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात बैठक झाली होती, तिथंही आंबेडकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती अशी माहिती मिळते आहे. त्यात सध्य़ा तरी याबाबत एमआय़एम संयमी भूमिका घेत आहे, एमआय़एम प्रदेशअध्यक्ष तर आम्हाला काहीच माहिती नाही असं सांगून वेळ कानावर हात ठेवत आहेत.

त्यामुळे भारिपला मुस्लिम मतांचा फायदा होत नसल्याचं प्रकाश आंबेडकरांचे मत बनले आहे. मुस्लिम मतदार एमआयएम नव्हे मौलानांच्या प्रभावाखाली असल्याची आंबेडकरांना वाटतं. तर एमआयएमला राज्यातील विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करण्याची अपेक्षा आहे त्यामुळे एमआयएमने विधानसभा निवडणुकीसाठी 98 जागांची मागणी केली आहे तर वंचितने एमआयएमला फक्त ८ जागांची ऑफर दिली आहे.

मागील वेळी आम्ही एकटे २४ जागांवर लढलो त्यामुळं इतक्या कमी जागा लढणार नाही अशी एमआयएमची ठाम भूमिका आहे, त्यात आंबेडकर ऐकायला तयार नाही असं कळतंय, तर आंबेडकरही याबाबत सध्या स्पष्ट बोलायता तयार दिसत नाही, काँग्रेससोबतची बोलणी झाल्यावर एमआयएमचं पाहू अशी भूमिका आंबेडकरांनी घेतली आहे.

हॅशटॅग्स

#MIM(30)#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x