महाराष्ट्र पोलीस दलात मोठी भरती; मात्र पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार
मुंबई : महाराष्ट्रातील शहर आणि प्रत्येक गावामधून तरुण-तरुणी वाट पाहत महाराष्ट्र पोलीस दलातील मेगा भरतीची तारीख जाहीर झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी ही भरती होणार आहे. दरवर्षी या पोलीस भरतीसाठी प्रत्येक गावातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. सध्या शहरांपासून ते गावांपर्यंत खाजगी नोकऱ्यांची भीषण परिस्थिती असल्याने या भरतीसाठी सर्वचजण तुटून पडणार असल्यास बोललं जातं आहे.
विशेष म्हणजे या भरतीवेळी एक मोठा बदल करण्यात आला आहे आणि तो म्हणजे पहिल्यांदा मैदानी परीक्षेत पास होणे आवश्यक होते, मात्र नव्या नियमानुसार इच्छुक तरुण आणि तरुणींसाठी लेखी परीक्षा पहिल्यांदा पास व्हावी लागणार आहे. त्यामुळे खूप कमी वेळ असल्याने तरुणांना मोठी कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, ग्रामीण भागात दुष्काळ आणि त्यानंतर ओला दुःष्काळ असं संकट ओढावल्याने आणि त्यात शेतीमध्ये नुकसान होत असल्याने गावातून मोठ्या संख्येने तरुण-तरुणी या पोलीस भरतीसाठी मैदानात प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं जातं आहे. दरवर्षी पेक्षा या वर्षी अधिक अर्ज येतील अशी परिस्थिती निर्माण झाली असून त्यात उच्च शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण देखील मोठं असेल अशी शंका व्यक्त करण्यात येते आहे.
याबाबत पोलीस विभागाने जिल्हावार जाहिरात प्रसिद्ध करण्याचे परिपत्रक अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके संजय सक्सेना यांनी आज काढले आहेत. उमेदवारांना पोलीस शिपाई भरतीसाठी ३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. हे अर्ज www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर भरायचे आहेत.
पोलीस भरतीसाठी ३ सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील मुख्य वृत्तपत्रांमध्ये जाहीरात प्रसारीत करण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. राज्यातील बृहन्मुंबई, ठाणे शहर, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, नागपूर शहर, नवी मुंबई, औरंगाबाद शहर, सोलापूर शहर व लोहमार्ग मुंबई या ठिकाणच्या जागांची जाहीरात निणार आहे. तर ग्रामीणमध्ये रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जळगांव, धुळे, नंदूरबार, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, जालना, भंडारा आणि लोहमार्ग पुणे या ठिकाणच्या जागांसाठी जाहिरात प्रसारीत कराव्यात असे परिपत्रकात म्हटले आहे.
३४५० जागांसाठी ही भरती होणार असून, भरतीची जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात झाली आहे. भरतीप्रक्रियेला तीन सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरू आहे. २३ सप्टेंबर पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मुंबईसाठी सर्वाधिक १०७६, तर त्यानंतर पिंपरी चिंचवडसाठी सर्वाधिक ७२० जागांसाठी भरती होईल.
https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advpolice या वेबसाईटवर जिल्हानिहाय जाहिरात पाहता येईल.
गृह विभागाने यंदा पोलीस भरतीप्रक्रियेमध्ये बदल केल्यानंतर, तसेच महापोर्टलद्वारे होणारी ही पहिली भरती आहे. यापूर्वी मैदानी चाचणी अगोदर घेतली जात असे. उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारालाच लेखी परीक्षेला पात्र ठरवले जात असे. मात्र, नवीन निर्णयानुसार पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
अशा आहेत जिल्हानिहाय जागा ?
मुंबई पोलीस भरती – १०७६
पिंपरी चिंचवड पोलीस भरती – ७२०
रत्नागिरी पोलीस भरती – ६६
रायगड पोलीस भरती – ८१
कोल्हापूर पोलीस भरती – ७८
सोलापूर पोलीस भरती – ७६
पालघर पोलीस भरती – ६१
पुणे रेल्वे पोलीस भरती – ७७
पुणे ग्रामीण पोलीस भरती – २१
पुणे पोलीस भरती – २१४
जळगाव पोलीस भरती १२८
सांगली पोलीस भरती – १०५
सातारा पोलीस भरती – ५८
औरंगाबाद पोलीस भरती – ९१
नागपूर पोलीस भरती – २८८
मुंबई रेल्वे पोलीस भरती – ६०
नवी मुंबई पोलीस भरती – ६१
ठाणे पोलीस भरती – १००
धुळे पोलीस भरती – १६
नंदुरबार पोलीस भरती -२५
भंडारा पोलीस भरती – २२
सिधुदुर्ग पोलीस भरती – २१
जालना पोलीस भरती -१४
कोणती कागदपत्र आवश्यक?
- ऑनलाईन अर्ज करताना इच्छुकांना काही कागदपत्र सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात तुमच्याजवळ ठेवणं आवश्यक आहेत. यामध्ये खालील कागदपत्रांचा समावेश आहे.
- तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.
- जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
- लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार
- ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
- डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
- प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
- जात प्रमाणपत्र वैधता
- सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
- आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
- खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC