22 November 2024 11:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

रायगड: राष्ट्रवादीला खिंडार, आमदार अवधूत तटकरे शिवबंधन बांधणार

mla awadhut tatkare, ncp, shriwardhan, shivsena

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधी भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधल्या अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्ष आणि सेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या आधी एनसीपी-काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. आता एनसीपीला आणखी एक धक्का बसणार आहे. एनसीपीचे आमदार अवधूत तटकरे हे सोमवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मागील काही दिवसांआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे सहकारी आणि खासदार माजिद मेमन हे मेट्रो भूमिपूजनच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमाला माजिद मेमन उपस्थित राहिल्याने ते देखील भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत की काय, अशी चर्चा सुरू झाली होती.

दरम्यान, पक्ष बदलाची चर्चा सुरू होताच माजिद मेमन यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. ‘मी पक्ष बदलणार नाही. शरद पवारांचा मी विश्वासू सहकारी त्यामुळे राष्ट्रवादी सोडण्याचा प्रश्नच नाही,’ असा खुलासा माजिद मेमन यांनी केला होता. मेमन यांनी भारतीय जनता पक्ष प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या असल्या तरी मेट्रो भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

सुनील तटकरे आणि अवधूत तटकरे यांच्यात वाद असल्याचे बोलले जाते. सुनील तटकरे यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्यानंतर त्यांनी आमदारकीवर दावा केला होता. तेव्हापासून त्यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे समजते. त्यातच सुनील तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अवधूत तटकरे यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय राष्‍ट्रवादी काँगेसचे जिल्‍हा सरचिटणीस रघुवीर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महाडचे आमदार भरत गोगावले यांनी शिवबंधन बांधून त्‍यांचे शिवसेनेत स्‍वागत केले. विकास हवा असेल तर शिवसेना-भाजप युतीशिवाय पर्याय नसल्‍याचे पक्ष प्रवेशानंतर रघुवीर देशमुख म्‍हणाले होते. मागील विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघातून अवधूत तटकरे यांचा निसटता विजय मिळवला होता. या निवडणुकीत अवधूत तटकरे यांना ६१,०३८ मते मिळाली. तर शिवसेनेचे रवी मुंडे यांना ६०९६१ मते मिळाली आहेत.

हॅशटॅग्स

#SunilTatkare(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x