25 November 2024 6:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

इंदुरीकर महाराज भाजपकडून थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना भिडणार?

Indurikar Maharaj, MLA Balasaheb Thorat, BJP Maharashtra, Mahajanadesh Yatra

नगर: लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. सर्वच पक्षांनी जनसंपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपची महाजनादेश यात्रा सुरु आहे. या यात्रेचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे.

ही यात्रा सध्या अहमदनगर जिल्ह्यात आहे. या यात्रेच्या संगमनेर येथील सभेत किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात इंदुरीकर महाराज यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरु आली आहे.

भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा काल नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये होती. त्यावेळी व्यासपीठावर इंदुरीकर महाराज उपस्थित होते. तेव्हापासून या चर्चांना उधाण आलं आहे. इंदुरीकर महाराज यांनी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गुफ्तगू केली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाल्या. परंतु प्रसार माध्यमांनी इंदुरीकर महाराजांशी संपर्क साधला असता, त्यांनी ही चर्चा खासगी असल्याचं सांगितलं.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x