22 November 2024 10:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

२०१० मध्ये मेट्रोला विरोध करणारे बच्चन दुसरं सरकार आल्यावर बदलले का? मनविसे उपाध्यक्ष अखिल चित्रे

Mumbai Metro, SaveAarey, Save Aarey, MNS Party, Akhil Chitre, Bollywood Actor Amitabh bachchan, Metro 3 Car Shade Aarey

मुंबई : बॉलिवूड अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोचं कौतूक करत आरेच्या जंगलतोडीला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. त्यानंतर मनसेने त्यांना अप्रत्युत्तर दिलं आहे. जंगल तोडून घरात झाड लावल्यानं जंगल तयार होत नाही, असं मत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी व्यक्त केले. २०१० ला मेट्रोला विरोध करणारे अमिताभ बच्चन सरकार बदलल्यानंतर कसे बदलले असाही सवाल चित्रे यांनी यावेळी केला.

मुंबई मेट्रो कारशेडसाठी आरे जंगलातील वृक्षतोडीला अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अप्रत्यक्ष समर्थन केल्यानंतर मनसेने कडाडून विरोध केला आहे. मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी कार्टून काढून, २०१० मध्ये मेट्रोला विरोध करणारे अमिताभ बच्चन नवीन सरकार आल्यावर मेट्रोला कसे पाठिंबा देत आहेत, असा सवाल विचारला आहे. तसंच जंगल तोडून घरात झाड लावल्याने जंगल तयार होत नाही, असंही म्हटलं आहे. त्यामुळे हा वाद आणखीन वाढण्याची चिन्हे आहेत.

अखिल चित्रे यांनी अमिताभ बच्चन यांच्या मेट्रो समर्थानाच्या ट्विटला प्रतिक्रिया दिली, “तुम्ही देखील आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत तुमच्या विदेशातून मागवलेल्या गाड्यांमधून प्रवास करण्याऐवजी लवकरच मेट्रोतून प्रवास कराल, अशी आम्हाला आशा आहे. घराच्या परिसरात झाड लावणं हा निसर्गातील जंगलांना पर्याय होऊ शकत नाही. वास्तव कल्पनेपेक्षा विचित्र असते’ असं चित्रे यांनी म्हटलं.

मेट्रो कारशेडसाठी आरेतील झाडांच्या कत्तलीला परवानगी मिळाली आहे. परंतु सामान्य नागरिक, अनेक पर्यावरण प्रेमी, राजकारणी आणि सेलिब्रिटींनी या निर्णयाचा विरोध केला आहे. रस्त्यावर उतरुन आंदोलनं सुरु आहेत. त्यातच या वादात आता अमिताभ बच्चन यांनी उडी घेतली आहे. अमिताभ बच्चन यांनी मेट्रोच्या समर्थनार्थ ट्वीट करुन कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला अप्रत्यक्षरित्या समर्थन केलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “माझ्या आजारी मित्राने रुग्णालयात जाण्यासाठी गाडीऐवजी मेट्रोचा वापर केला म्हणून तो लवकर पोहोचला. परत आला तेव्हा फारच प्रभावित झाला होता. म्हणाला अतिशय वेगवान, सोयीस्कर आणि सर्वात कार्यक्षम प्रवास. प्रदूषणावर उपाय. जास्त झाडे लावा. मी माझ्या गार्डनमध्ये लावली आहेत, तुम्ही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x