५ वर्ष उद्योगमंत्री सेनेचेच; मग आदित्य यांनी बेरोजगारी कमी का केली नाही? डॉ. अमोल कोल्हे
कर्जत: मी पुन्हा मुख्यमंत्री होणार असे म्हणत जनादेश यात्रा काढणारे मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाहिले आहेत. पाच वर्ष कामे केली असती तर हि वेळ आली नसती. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे प्रदुषण मुख्य महाराष्ट्र करण्याची भाषा करत आहेत. मग पर्यावरण मंत्री रामदास कदम काय करत होते. पाच वर्षांत शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेली १५ कामे दाखवा असे म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना भाजपवर निशाणा साधला. ते कर्जत येथे शिवस्वराज्य यात्रे दरम्यान आयोजीत सभेत बोलत होते.
काल शिवस्वराज्य यात्रेच्या चौथ्या टप्याची सुरवात कर्जत-रायगड मधून झाली,भर पावसात लोक आतुरतेने शिवस्वराज्य यात्रेच्या स्वागतास उपस्थित होते,इंदापूर, तळा जि.रायगड या ठिकाणी धो धो कोसळणाऱ्या पावसात माता-भगिनी तरुणाईचा उस्फुर्त प्रतिसाद हा राज्यात भाकरी फिरवल्या शिवाय राहणार नाही pic.twitter.com/vuFEiXAW9Q
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) September 20, 2019
आदित्य ठाकरे बेरोजगारमुक्त महाराष्ट्र करायचा म्हणतात. मग पाच वर्षे तुमच्या मंत्र्यांनी काय केले? उद्योग व पर्यावरण मंत्री तुमचेच होते ना? पाच वर्षांत शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्यात निर्णायक पंधरा कामे केली असतील ती त्यांनी दाखवावीत’ असे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले. कर्जतमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या अंतिम टप्प्यानिमित्त शेळके बंधू कार्यालयाच्या सभागृहात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. अमोल कोल्हे बोलत होते.
शिवस्वराज्य यात्रेच्या चौथ्या टप्याची सुरवात आज कर्जत जि रायगड या ठिकाणाहून सुरवात झाली.
महाराष्ट्रातील भाजप – शिवसेना सरकारने गेल्या ५ वर्षात केलेल्या विकास कामांपैकी १५ ठोस विकास कामे ?? जर केली असतील तर जनतेला सांगावीत !!! pic.twitter.com/q3Aep3ojOq— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) September 19, 2019
राज्यात पाच वर्षांत 983 कारखाने बंद झाले. १ लाख ४३ हजार लहान मोठे उद्योग बंद झाले. यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले. मुख्यमंत्री यावर काही बोलायला तयार नाही. शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी विषय काढले याबद्दलही बोलायला तयार नाहीत. आदित्य ठाकरे आज नवा महाराष्ट्र घडवण्याची भाषा करत आहेत. मग पाच वर्ष शिवसेनेचे मंत्री नेमके काय करत होते असा सवाल कोल्हे यांनी यावेळी केला. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता मसुरकर, आमदार सुरेश लाड आणि खासदार सुनील तटकरे यांनीही उपस्थितांना संबोधित केले.
भाजपावाले म्हणतात चांगले काम भाजपा सरकार करते, तर शिवसेनावाले म्हणतात वाईट काम भाजपा सरकारने केले. यावरून युती सरकारने गेली पाच वर्षे राज्यातील जनतेला मुर्ख बनवण्याचे काम फक्त केले आहे – खा. @kolhe_amol @ShivSena @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @OfficeofUT pic.twitter.com/aVkiqf4NJz
— NCP (@NCPspeaks) September 19, 2019
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार