22 April 2025 5:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मनसे शंभरच्या आसपास जागा लढणार; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला

MNS, Maharashtra Navnirman Sena, Raj Thackeray, Amit Thackeray, Vidhansabah Election 2019, Maharashtra assembly election 2019

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी निवडणुकीत मनसे १०० जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विभाग प्रमुखांची आज ‘कृष्णकुंज’ इथे बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरेंनी नेत्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

मनसे ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे, सोलापूर, पंढरपूर, वणी, हिंगणघाट, हिंगोली, औरंगाबाद आणि कोकणातील ठराविक जागांवर मनसे निवडणूक लढवणार असल्याचं कळतं. राज ठाकर यांनी उमेदावारांची यादी मागवली असल्याची माहिती देखील मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या भाषणाचा प्रभाव दिसून आला होता. मात्र लोकसभेच्या निकालांनंतर मनसेच्या गोटात तशी शांतताच होता. त्यातच मनसे यंदा विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे वृत्त पसरल्याने मनसैनिकांच्या गोटात निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पक्षाने संपूर्ण राज्यात निवडणूक न लढवता प्रभावक्षेत्र असलेल्या भागात निवडणूक लढवावी, अशी मागणी मनसैनिक आणि नेत्यांकडून करण्यात येत होती.

तसंच राज ठाकरे यांनी यावेळी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याचं जाहीर केल्याचीही माहिती आहे. आघाडीसोबत जाण्याची अद्याप तरी मसनेकडून कोणतीही तयारी करण्यात आलेली नाही. काही दिवसांपुर्वी विधानसभा निवडणूक लढवाची की नाही यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये दुमत आहे अशी माहिती समोर आली होती.

राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी ही बैठक पार पडली होती. या बैठकीत विधानसभा निवडणूक लढवायची की नाही यावर चर्चा झाली होती. या बैठकीनंतर बोलताना बाळा नांदगावकर यांनी योग्य वेळी राज ठाकरे निर्णय जाहीर करतील असं म्हटलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठकीत निवडणूक लढवायची की नाही याबाबत नेत्यांची मतं जाणून घेतली होती. काही नेत्यांनी निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली होती. तर काहींनी मात्र थांबण्यास सांगितलं होतं त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या