22 November 2024 10:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

उद्धव म्हणाले युतीचा फॉर्मुला लोकसभेलाच ठरला; चंद्रकांत दादा म्हणतात कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही

Minister Chandrakant Patil, Shivsena, BJP Maharashtra, Vidhansabha Election 2019, Maharashtra Assembly Election 2019, Shivsena BJP Alliance

मुंबई: युतीचा फॉर्मुला लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळीच ठरलेला आहे. युतीमध्ये कुठलाही तिढा नाही. येत्या एक ते दोन दिवसांत युतीची घोषणा होईल,’ अशी माहिती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. भाजपवर नाराज असलेले विदर्भातील शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी प्रसंगी बोलताना उद्धव यांनी भाजप-शिवसेना युतीबाबतच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. ‘नाणारचं जे काही व्हायचं आहे, ते आधीच झालेलं आहे. ‘आरे’बाबतची शिवसेनेची भूमिका लोकभावनेला धरूनच आहे. त्यामुळं युतीमध्ये गोंधळण्यासारखं काही नाही,’ असंही उद्धव म्हणाले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी युतीचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरला नसल्याचं सांगितलं आहे. भाजपाची निवडणूक समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी १०० टक्के युती होईल, मात्र युतीचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही असं सांगितलं आहे. तसंच युतीचा निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच भाजपा आणि शिवेसना युतीची घोषणा होण्याची शक्यता असल्याची सुत्रांची माहिती आहे. २२ सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह मुंबईत असून यावेळी युतीची घोषणा केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रकांत पाटील यांना मात्र याबाबत अधिकृतपणे काही सांगितलं नाही. युतीची जेव्हा घोषणा होईल तेव्हा सोबत जो कोणी केंद्रीय मंत्री असेल ते पत्रकार परिषदेत असतील असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x