22 November 2024 12:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | SBI चा हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL
x

नव्हे नव्हे नवे रस्ते घडवलेत तरी नवा महाराष्ट्र घडेल; सुमित राघवन यांचा आदित्य यांना टोला

Sumeet Raghavan, Aaditya Thackeray, Aditya Thackeray, Yuvasena, Shivsena

मुंबई: स्मार्ट सिटी’च्या वल्गना करत मोफत वायफायसारख्या सुविधा देण्याच्या घोषणा करणाऱ्या मुंबई, ठाणे यांसारख्या शहरांतील रस्त्यांची अवस्था पाहिली तर ‘आपण खेडय़ात तर नाही ना’ असा प्रश्न निर्माण होतो. अशा खड्डेमय रस्त्यांवरून दररोज प्रवास करणारे सर्वसामान्य एकीकडे मिळेल त्या माध्यमातून आपल्या वेदना मांडत असताना मराठी चित्रपट-नाटय़सृष्टीतील कलाकारांनीही यात आपला आवाज सामील केला आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव, चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी यांच्यासह आता अभिनेता पुष्कर श्रोत्री यानेही प्रशासनावर जोरदार टीका केली.

दरम्यान, मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये शिवसेनेची सत्ता असल्याने आता मराठी कलाकारांनी शिवसेनेवर देखील लक्ष केंद्रित केलं आहे. शिवसेनेच्या विरोधामुळं गाजत असलेल्या मुंबईतील मेट्रो-३ प्रकल्पाला पाठिंबा दिल्यानंतर अभिनेता सुमीत राघवन यानं आता पुढचं पाऊल टाकलं आहे. सुमीतनं ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना मुंबईतील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून सुनावलं आहे. सुमीतच्या या ट्विटची राजकीय व सांस्कृतिक वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

आदित्य यांच्या या ‘नव्या महाराष्ट्रा’च्या ट्विटवर सुमीतनं अत्यंत बोचरी प्रतिक्रिया दिलीय. ‘नवे रस्ते घडवलेत तरी नवा महाराष्ट्र घडेल,’ असं त्यानं म्हटलंय. सोबत #येरेमाझ्यामागल्या असा हॅशटॅगही दिलाय. सुमीतच्या या टीकेला शिवसेना कसं प्रत्युत्तर देते, हे आता पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x