22 November 2024 5:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

'१९९०-१८३ जागा ते २०१९-१२६' जागा! भाजपसोबत सेनेच्या अधोगतीचा प्रवास: सविस्तर

Shivsena, Uddhav Thackeray, Yuti, Alliance with BJP

मुंबई: नव्वदच्या दशकात जन्माला आलेली भाजप-शिवसेना युतीचा इतिहास सर्वात मोठा आहे. मात्र तेव्हा पासूनच युतीचा जागा वाटपाचा प्रवास पाहिल्यास शिवसेना अस्ताच्या दिशेने स्वतःहूनच जाते आहे का असा प्रश्न आकडेवारी सिद्ध करत आहे. विशेष करून उद्धव ठाकरे यांचं राजकारणातील सक्रिय होणं आणि त्यानंतर शिवसेनेच्या युतीतील जागांचा कानोसा घेतल्यास उद्धव ठाकरे यांच्या नैर्तृत्वात शिवसेना वाढते आहे की घटते आहे असा प्रश्न आकडेवारी उपस्थित करत आहे.

१९९० साली एकूण २८८ जागांपैकी १८३ जागा लढवल्या होत्या. त्यानंतर १९९५ मध्ये देखील १८३ लढवत शिवसेना-भाजपच्या युतीची राज्यात पहिल्यांदाच सत्ता आली होती आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता. १९९५-२००० या सत्ताकाळात उद्धव ठाकर प्रत्यक्ष राजकारणात कार्यरत झाले नव्हते आणि शिवसेना स्वतः बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेच सांभाळत होते. त्यानंतर १९९९ मध्ये युतीचं सरकार गेलं आणि १९९९ मध्ये शिवसेनेत उद्धव ठाकरेंचा वावर दिसू लागला.

त्यानंतरच्या निवडणुकीत म्हणजे २००४मध्ये सेनेच्या वाट्याला युतीतील १६३ जागा आल्या आणि २००९मध्ये तोच आकडा घसरून १६०वर आला. त्यानंतर २०१४ मध्ये युती झालीच नाही. मात्र सेनेच्या एकूण जागा या विरोधी पक्षात असताना होत्या त्यापेक्षा थोड्याफार अधिक आल्या आणि भाजपने जोरदार मुसंडी घेतली. आज २०१९च्या विधानसभा निवडणुकीसाठी युतीची बोलणी सुरु असली तरी शिवसेनेची अपेक्षा १२६ जागांची असून, भाजप त्यातही १२० जागा देण्यावर अडून बसली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नैत्रुत्वात शिवसेना सत्तेत गेली असं शिवसेना सांगत असली तरी समोर असणारी आकडेवारी वास्तव सिद्ध करते आहे. कारण या घटत्या आकडेवारीत शिवसेना अधोगतीला जाते आहे हे मात्र स्पष्ट आहे.

दरम्यान अमित शाह रविवारी मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी युतीचा फॉर्म्युला ठरविल्याचे सांगण्यात येते. भाजपकडून सुरुवातीला शिवसेनेला १०५ जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र शिवसेनेने तो प्रस्ताव फेटाळल्यानंतर भाजपकडून १२६ जागांचा प्रस्ताव नव्याने मांडण्यात आला असून तो शिवसेनेने मान्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेनेने २०१४ मध्ये स्वबळावर निवडणूक लढवली होती. यावेळी मात्र शिवसेना १२६ जागांवर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. २०१४ पूर्वी शिवसेना १७१ जागांवर आणि भाजप ११७ जागांवर निवडणूक लढवत होते. मात्र भाजपची वाढलेली ताकद पाहता शिवसेना १७१ वरून १२६ जागांवर आल्याचे चित्र आहे. त्यामुळे एक काळ असा होता की ज्यावेळी बाळासाहेब सांगतील त्याप्रमाणे भाजप झुकायचं तर आज भाजप सांगते तसं उद्धव ठाकरे झुकतात हे चित्र नेहमीच पाहायला मिळत आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x