22 November 2024 9:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

युतीचा निर्णय काही असो; तिकीट कापलं जाण्याच्या भीतीने सेना-भाजप इच्छुक मनसेच्या संपर्कात

Shivsena, BJP, MNS, Maharashtra Navnirman Sena, Raj Thackeray, Maharashtra Vidhansabha Election 2019, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई: एकेकाळी राज्यात शिवसेना मोठा भाऊ होता. त्यामुळे १७०-१८०च्या घरात जागा शिवसेना लढवत होती. आता मात्र, चित्र बरोबर उलट झाल्यामुळे शिवसेनेला अपेक्षित असलेल्या जागा भाजप सोडायला तयार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये जागांवरून चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, तरीदेखील त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप शिवसेनेला १२३ जागा सोडायला तयार आहे, मात्र शिवसेनेला त्याहून जास्त जागा हव्या आहेत. त्यामुळे ही दिरंगाई होत असून आज १२ वाजता अमित शहांसोबत मुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या बैठकीमध्ये यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

पुण्यातील कोथरूड, कॅन्टोनमेंट, हडपसर हे मतदारसंघ सेनेला हवे आहेत. नाशिक येथे भाजपच्या सीमा अहेर तसेच माजी मंत्री डॉ.दौलतराव अहेर यांचे पुत्र डॉ.राहुल यांनी जिंकलेल्या मतदारसंघांवर सेनेने दावा केला आहे. धुळे शहर मतदारसंघातून अनिल गोटे यांनी भाजपला अडचणीत आणले, तो मतदारसंघ आता आम्हाला दया, असे सेना म्हणते. सोलापूर येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जिंकलेला मतदारसंघ आम्हाला हवा आहे, असे सेनेचे म्हणणे आहे. आमचा पक्ष वाढवण्यासाठी आम्हाला संधी दया असे म्हणणे अयोग्य आहे काय, असा सेनेचा युक्तीवाद असून सेनेचे उमेदवार जिंकून येणे अशक्‍य असताना आग्रह कशाचा, असा भाजपचा प्रश्‍न आहे.

या वेळी भाजपने १२२ पेक्षा जास्त जागा दयायच्या तरी कशा, अशी विचारणा करत लवकर सहकाऱ्यांशी बोलून काय ते ठरवा असे सेनेला कळवले असल्याचे विश्‍वसनीयरित्या समजते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मुंबईतील संभाव्य दौरा अंतिम न झाल्याने युतीची घोषणा केंव्हा या शंकेने पछाडलेल्या काही सेनानेत्यांनी मध्यस्थीसाठी भाजपशी संपर्क सुरू ठेवल्याचे समजते. आदित्य यांच्या चमूने सेनेचा लाभ भाजपसमवेत रहाण्यात असल्याचेसमजून घ्यावे यासाठी सेनेतील ज्येष्ठ मंत्री प्रयत्न करीत आहेत. निवडणूक खर्चाचा तपशील उचला असे मंत्र्यांना कळवण्यात आल्याने मंत्रीवर्गात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे जवळपास १०० ते १२० जागा लढविणार असल्याची माहिती आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या मनसेचा प्रभाव असणाऱ्या भागामध्ये मनसे संपूर्ण ताकदनिशी उतरणार आहे. या विभागातील सर्व जागा मनसेने लढविण्याचा निर्णय केला आहे. तर मराठवाडा, विदर्भ, कोकण याठिकाणच्या मोजक्या जागांवर मनसे लक्ष केंद्रीत करणार आहे. मनसेच्या इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्याचं काम सध्या सुरु आहे अशातच काही शिवसेना भाजपातील इच्छुकांनी मनसेशी संपर्क साधला असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x