24 November 2024 5:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

वरळीला जागतिक पातळीवर घेऊन जाणार: आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray, Aditya Thackeray, Worli Constituency

मुंबई: विधानसभेसाठी महायुती होणार की नाही याबरोबरच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणार की नाहीत, याविषयी गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, महायुतीसह आदित्य यांच्या निवडणूक लढवण्यावरही सोमवारी शिक्कामोर्तब झाले. ‘वरळी मतदारसंघातून मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे’, असे खुद्द आदित्य यांनीच जाहीर केले. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात उतरणारे आदित्य हे ‘ठाकरे’ कुटुंबातील पहिली व्यक्ती ठरले आहेत.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ‘मला वरळीला जागतिक पातळीवर न्यायचे आहे असं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं. राजकारणात असल्यास एका निर्णयामुळे तुम्ही लाखो लोकांचे भविष्य घडवू शकता. त्यामुळेच मी निवडणुकीला उभा राहतोय’, असे आदित्य म्हणले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी असल्यानेच निवडणूक लढवत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीदरम्यान माझा प्रचार कराच, पण प्रतिस्पर्धी उमेदवारालाही त्याचा प्रचार करू द्या, असे आवाहन यावेळी आदित्य यांनी शिवसैनिकांना केले. ‘सध्या हीच निवडणूक लढवण्याची नेमकी वेळ आहे. महाराष्ट्र कर्जमुक्त करण्याची, प्रदूषणमुक्त करण्याची, बेरोजगारीमुक्त करण्याची हीच ती वेळ आहे. म्हणूनच मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, माझ्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. मी बिनधास्त झेप घेत आहे’, असेही ते म्हणाले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

वास्तविक मुंबई शहरावर शिवसेनेची मागील २५ वर्ष निर्विवाद सत्ता असून वरळी देखील त्याच मुंबईत येते याचा आदित्य ठाकरेंना विसर पडला असावा. अगदी मुंबई शहराच्या एकूण स्थितीबाबत बोलायचे झाल्यास, मागील वर्षी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं केलेल्या हवा प्रदूषणाच्या चाचणीत मुंबईत सर्वाधिक प्रदूषण होत असून मुंबई यादीत चौथ्या स्थानावर आहे. तत्पूर्वी याच यादीमध्ये मुंबई शहर ५व्या स्थानी होतं. पण हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे मुंबई आता पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आली आहे. डब्ल्यूएचओच्या अहवालातील जगातील ८५९ सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबईचं स्थान ६३वं आहे. मुंबईतलं प्रदूषण हे बिंजिंगपेक्षाही अधिक आहे अशी धक्कादायक माहिती यातून समोर आली होतं. त्यानंतर देखील विकासाचा खोटा मुखवटा घालून शिवसेना आरेमधील वृक्षतोडीला पालिकेत कसा छुपा पाठिंबा देत आहे हे समोर आलं आहे

मात्र इथल्या अर्थकारणावर बोलायचे झाल्यास त्यात मात्र मुंबईने बाजी मारली असल्याचं देखील एका अहवालात स्पष्ट झालं होतं. जगातील पहिल्या १५ श्रीमंत शहरांमध्ये भारताची आर्थिक राजधानी ‘मुंबई’चाही समावेश आहे. मुंबईची एकूण संपत्ती ९५० अब्ज डॉलर्स साधारण ६१ लाख कोटी रुपये एवढी आहे. जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत ३ ट्रिलियन डॉलर्स (सुमारे १९३ लाख कोटी) संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहे ‘न्यू यॉर्क शहर’.

‘न्यू वर्ल्ड वेल्थ’ या संस्थेच्या अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. हा अहवाल तयार करताना, कोणत्याही शहराच्या एकूण संपत्तीत त्या शहरातील लोकांच्या वैयक्तिक कमाईचा समावेश केला गेला आहे. यात सरकारी निधी समाविष्ट करण्यात आलेला नाही. मुंबईत संपत्ती तर जास्त आहे. पण इथे राहणाऱ्या मुंबईकरांचं आरोग्य, मुंबईत वाढती लोकसंख्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईचं वाढतं प्रदुषण. यावर मात्र सगळ्या बाजूनेच दुर्लक्ष आहे. यावरही सर्वेकरून त्याच्या अहवालावर काम करणं महत्त्वाचं आहे.

लोकांना दर ५ वर्षांनी तीच तीच आश्वासनं दाखवून वर्षानुवर्षे झुलवत ठेवण्याची राजकारण्यांची कला आदित्य ठाकरे यांनी अवगत केल्याचे कालच्या त्यांच्या भाषणात स्पष्ट झालं आहे. औरंगाबादमध्ये याच शिवसेनेची कित्येक वर्ष सत्ता असून ते शहर कचराकोंडीमुळे दंगल उसळणार पहिलं शहर असावं. त्यात कल्याण-डोंबिवली शहरातील मूलभूत पायाभूत सुविधांचे वास्तव तिथले स्थानिक रोज अनुभवतात. मात्र याच शहरांमध्ये आदित्य ठाकरे यांनी पुन्हा ‘मला कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबाद’ जगातील पातळीवर घेऊन जायचे आहे असं आश्वासन दिल्यास आश्चर्य वाटणार नाही. त्यात कार्यकर्त्यांमध्ये ‘नागरिक’ संपुष्ठात आला असून केवळ ‘कार्यकर्ता’च शिल्लक राहिल्याने शहरांचं भविष्य भीषण आहे असंच म्हणावं लागेल.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x