आदित्य यांचं 'केम छो वरली'; मराठी माणूस म्हणतो इथेच आपला 'गेम छो मुंबई': सविस्तर
मुंबईः युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी काल वरळी मतदार संघातून आपली उमेदवारी जाहीर केली आहे. देशात आणि महाराष्ट्रात मराठी हक्कासाठी लढणारा पक्ष अशी ओळख असलेल्या शिवसेनेकडून वरळीत “केम छो वरली” असे लिहिलेले बॅनर झळकले आहेत.या बॅनरवर आदित्य ठाकरे यांची छबी असल्याने विरोधकांना निवडणुकीच्या तोंडावर आयते कोलीत मिळाले आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी मतदार संघातून शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणाऱ्या पहिला व्यक्तीचा मान आदित्य ठाकरे यांना मिळाला आहे. शिवसेनेची प्रतिमा मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष अशी आहे.मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून वरळीमध्ये ‘केम छो वरली’ अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरबाजीवरून समाज माध्यमात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वरळीतील उच्चभ्रू गुजराती मतं मिळवण्यासाठी व गुजराती समाजाला आकर्षित करण्यासाठी शिवसेनेकडून ही पोस्टरबाजी करण्यात आली असल्याची चर्चा आहे.
अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवरुन शिवसेनेच्या गुजराती पोस्टरचा समाचार घेतला आहे. शिवसेनेचा वाघ आता ढोकळा खायला लागला अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तर मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारा पक्ष असे बिरुद मिरवणारा पक्ष आता केम छो वरली म्हणतोय वा रे राजकारण असेही एका नेटकऱ्याने म्हटले आहे. दादा काय झालं मराठीचा विसर पडला का? असे एका नेटकऱ्याने विचारले आहे
आदित्य ठाकरेंच्या गुजराती बॅनरवरुन सोशल मीडियानं शिवसेनेला धारेवर धरलं आहे. मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा पंतप्रधान मोदींचा प्रयत्न आहे. उद्योगधंदे गुजरातला नेले जात आहेत, अशी टीका शिवसेनेनं अनेकदा केली आहे. त्याच टीकेची आठवण सोशल मीडियावर अनेकांनी करुन दिली आहे. हाच का शिवसेनेचा मराठी बाणा, असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले आहेत. मराठी मराठी करणाऱ्या शिवसेनेला आता त्याच मराठीचा सोयीस्कर विसर पडल्याची टीकाही अनेकांनी केली आहे.
@ShivSena चा वाघ आता ढोकळा खायला लागला!
उमेदवारी जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे “केम छो वरली” https://t.co/uxL34j4226
— Shreenivas Bikkad (@shreenivasab) October 1, 2019
#मराठी हक्कासाठी आम्ही @ShivSena
आता ‘केम छो वरली’ बोलायला लागली@AUThackeray
किती हि लाचारी
यांना वरळी चे मुख्यमंत्री नक्कीच मिळेल #शिवसेना
#म pic.twitter.com/lz47uSxKey— Digamber ???? ???? (@Digamber) October 1, 2019
आम्ही बोलतो मराठी, आम्ही चालतो मराठी
मराठी आमचा बाणा…..
पण होर्डिंग मात्र गुजरातीत हाना….!!!!!#गुजराती_लंपट #आदित्य_ठाकरे pic.twitter.com/VpWkcDlmdi— Nandu Karmalkar (@KarmalkarNandu) October 1, 2019
आता शिव वडापाव नाही तर खमंग ढोकळा घ्या! गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी घेतला गुजराती भाषेचा आधार. त्यामुळे कार्यकर्त्यांना वडापाव ऐवजी खमंग ढोकळा दिला जाईल. pic.twitter.com/J6NPtdM5ou
— Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) October 1, 2019
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार