22 November 2024 7:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

तीस वर्षीय आदित्य ठाकरे यांची एकूण संप्पती ११ कोटी ३८ लाख

Yuvasena, Shivsena, Aaditya Thackeray, Aditya Thackeray, Maharashtra Vidhansabha Election 2019

वरळी: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक रिंगणात उतरणारे आदित्य हे पहिले ठाकरे ठरले आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि सर्व ठाकरे कुटुंब उपस्थित होते. हा अर्ज भरण्यापूर्वी आदित्य ठाकरेंनी वरळीत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.

आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीची एकजूट दाखवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित रहाणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. पण मुख्यमंत्र्यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्याचं सांगण्यात येत आहे. सकाळी ९ वाजता लोअर परळ इथल्या ‘शिवालय’ या शिवसेना शाखेपासून आदित्य ठाकरे यांचं मोठं शक्ती प्रदर्शन करत मिरवणूक निघाली. त्यानंतर त्यांनी वरळी इथल्या बीएमसी इंजिनियरिंग हबमधील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.

आदित्य ठाकरे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार १६ कोटींच्या घरात हा आकडा जातो. त्यामध्ये आदित्य ठाकरेंच्या नावे १० कोटी ३६ लाखांच्या ठेवी असून त्याशिवाय त्यांच्या नावावर ६४ लाख ६५ हजार रुपये किंमतीचे दागिने देखील आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे एक बीएमडब्ल्यू कार देखील आहे. त्याव्यतिरिक्त २० लाख ३९ हजार रुपयांचे बॉण्ड देखील त्यांच्या नावे आहेत. कर्जत-खालापूर परिसरामध्ये त्यांच्या नावावर काही जमीन देखील असल्याचं या प्रतिज्ञापत्रातून समोर आलं आहे.

वरळीतून लढणाऱ्या आदित्य ठाकरेंसमोर फारसं आव्हान नाही. सध्या शिवसेनेचेच सुनील शिंदे या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे माजी आमदार सचिन अहिर यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी ही निवडणूक सोपी असेल. आदित्य रिंगणात असल्यानं राज ठाकरेंच्या मनसेनं वरळीत उमेदवार दिलेला नाही. मनसेनं जाहीर केलेल्या दोन यादींमध्ये वरळी मतदारसंघाचा समावेश नाही.

आदित्य ठाकरेंची संपत्ती
बँक ठेवी : १० कोटी ३६ लाख १५ हजार २१०
बॉन्ड शेअर्स : २० लाख ३९ हजार १२
वाहन : बीएमडब्ल्यू कार
एमएच : ०९ सीबी – १२३४
किंमत : ६ लाख ५० हजार
दागिने : ६४ लाख ६५ हजार ०७४
मालमत्ता : ४ कोटी ६७ लाख ०६ हजार ९१४
इतर : १० लाख २२ हजार ६१०
एकूण : १६ कोटी ४ लाख ९८ हजार ८२०

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x