22 November 2024 8:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

भुसावळ गोळीबाराने हादरले, भाजप नगरसेवकासह चौघांचा मृत्यू

Bhusawal Gang war, BJP Corporator, bhusawal nagar palika

भुसावळ: पूर्ववैमनस्यातून करण्यात आलेल्या हल्ल्याने रविवारी रात्री भुसावळ शहर हादरले. भाजपाचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्यावर तीन जणांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात रवींद्र खरात (५०) यांच्यासह त्यांचे बंधू सुनील बाबूराव खरात (५५) मुलगा सागर रवींद्र खरात (२४), रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात (२०), सुमित गजरे हे पाच जण ठार झाले आहेत. तर इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपीही जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

भाजपाचे नगरसेवक रवींद्र खरात हे भुसावळमधील समता नगर येथे राहतात. रविवारी रात्री पावणे दहा वाजता चार हल्लेखोरांनी खरात यांच्या घराच्या अंगणात येऊन अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यामुळे खरात यांच्या कुटुंबियांची एकच धावपळ उडाली. या गोळीबारात खरात यांचे बंधू सुनील खरात आणि त्यांचा मुलगा सागर हे जागीच ठार झाले. तर स्वत: रवींद्र खरात आणि त्यांचा मुलगा रोहित खरात आणि सुमित गजरे यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.

या हल्ल्यात रवींद्र खरात यांची पत्नी पत्नी रजनी खरात, दुसरा मुलगा हितेश आणि अजून एकजण असे चारजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, सलग दुसऱ्यांदा खरात यांच्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे भुसावळ शहर हादरून गेले आहे. यापूर्वीही खरात यांच्या घरावर जमावाने दगडफेक करत गोळीबार केला होता. गावठी पिस्तूलातून हवेतून तीन फैरी झाडण्यात आल्या होत्या. त्यावेळी या हल्ल्यातून खरात थोडक्यात बचावले होते.

हल्ल्यात वापरलेली शस्त्रे घटनास्थळावरून पोलिसांनी जप्त केली असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या गोळीबारात जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाला. या घटनेमागील खरं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

गोळीबारात मयत झालेल्याची नावे

  1. सागर रवींद्र खरात
  2. हंसराज रवींद्र खरात
  3. रवींद्र बाबुराव खरात
  4. मोहित गजरे
  5. सुनिल बाबुराव खरात

गोळीबारानंतर 1) शेखर मेघे 2) मोहसीन अजगर खान 3) मयुरेश सुरडकर हे स्व:त पोलीस ठाण्यात हजर झाले असून पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x